बातमी 24तास
(प्रतिनिधी आरिफभाई शेख)
आषाढी वारीचा तो प्रसंग सर्वांनाच आठवतो. अतिशय बिकट अवस्था आणि आरोप पत्यारोप. त्यामुळे आळंदी प्रस्थान सोडायला लागलेले गालबोट आणि वारकऱ्यांची बदनामी या सर्व स्तरातून गेल्यानंतर घडलेल्या प्रकाराची दखल घेतली प्रशासना सह सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांनी दक्षता घेत या प्रकाराची दखल घेतली असून शिक्षण संस्थेने वारकरी विद्यार्थ्यांना एक पत्र काढले आहे. या पत्रामध्ये प्रत्येक दिंडीला गेल्या वर्षी 75 पास दिले होते. त्याऐवजी आता 90 पास दिले असून विद्यार्थ्यांनी आपण चालत असलेल्या दिंडी मालकांच्या कडून ते पाच घ्यायचे आहेत आणि मंदिरात पालखी सोहळ्यासाठी प्रवेश करायचा आहे. एवढेच नाही तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिर संस्थान तसेच पोलीस प्रशासन यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असे गैरवर्तन केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे आणि सदरचे गैरवर्तन याशी सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेचा कुठलाही संबंध राहणार नाही अशी तंबी या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. मुळात घडलेलं गैरप्रकार आणि त्यामुळे अलंकापुरीची झालेली बदनामी पर्यायाने वारकरी समाज बांधवांची झालेली बदनामी आणि पालखी सोहळ्याला लागलेले गालबोट हे प्रत्येकाच्या जिव्हारी लागले आहे. समज गैरसमज करून एकमेकांवर आरोप त्या रोग झाले परंतु पालखी सोहळा हा कालही आदर्श होता आजही आदर्श आहे आणि उद्याही आदर्श राहणारच याची पावती कोणीही देण्याची गरज नाही. काही अपप्रकार घडले असतील तर त्या अपप्रकाराला माऊलीच्या सोहळ्याला गालबोट लागणे ही खेदाची बाब आहे. यासाठी सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेने उचललेले पाऊल हे वारकरी संप्रदायाचा आदर्श जपण्यास एक महत्त्वपूर्ण कृती आणि संस्कार जपण्याचे एक पाऊल समजले जात आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ हा वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाने केला जाऊ नये जो अयोग्य आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे वारकरी समाज बांधवांना गालबोट लागू नये पर्यायाने पालखी सोहळा ला गालबोट लागू नये याची काळजी सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेकडून पालकत्वाच्या नात्याने घेतली गेली आहे.