(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) वाघेश्वर चऱ्होली बैलगाडा शर्यतीसाठी विविध जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी झाली. येथील मशिदीसमोर मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी झाली.त्याचबरोबर मुस्लिम समाजाने फटक्यांची आतषबाजी करत शिवरायांच्या मिरवणुकीचे स्वागत केले आणि फुलांचीही उधळन केली.शिवरायांच्या महाराष्ट्राची ही खरी ताकद भगवेदारींनी दाखवली ती म्हणजे हिंदू मुस्लिम जात भेद आम्ही मानत नाही हे आमचे सर्व मित्र आहेत. आम्ही एकोप्याने राहतो आणि राहणार या विचाराने चऱ्होलीकर ग्रामस्थ नांदत आहेत. भगवेदारी यांनी घोषणा द्यायच्या आधी मुस्लिम समाजाच्या युवकांनी जय शिवाजी जय भवानीच्या नावाचा जल्लोष केला.इतकेच नाही तर रमजान ईदच्या पवित्र रात्रीची नमाज उरकती घेत.शिवरायांच्या पालखीवर,मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली.याबाबत भगवे रक्षक असणाऱ्या शिवभक्तांना विचारले असता त्यांनी.. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय असे सांगत.आमच्याकडे जात भेद असले काही प्रकार होत नाहीत.हे मुस्लिम नाहीत,माझे मित्र आहेत, आणि जीवाभावाचे आहेत आम्ही एका ताटात जेवतो,अशी प्रतिक्रिया शिवशंभु भक्तांनी दिली. आणि महाराष्ट्र कलूषित करणाऱ्या इतर ठिकाणच्या वातावरणाला चांगलीच चपराक बसली आहे.हिंदू भगवेधारी भगवी टोपी घालून आणि मुस्लिम गोल समाजाची टोपी घालून एकत्र मिरवणुकीत गळाभेट करताना दिसले.ही परंपरा वर्षांवर्षे चालू आहे त्यात कुठलाही खंड पडला नाही.असे चऱ्होलीकर् ग्रामस्थ सांगतात,ग्रामस्थांनी शिवरायांच्या खरा विचारा जपला.आणि छत्रपती शिवरायांनी जो मावळा घडवला,त्याचे जिवंत दर्शन चऱ्होली गावामध्ये दिसून आले आहे.छत्रपती शिवराय जातीभेद मानत नव्हते आणि त्याचे पाईक चऱ्होली ग्रामस्थ मावळे आहेत हे छाती ठोकून ते सांगतात आणि तसे विचार जगतात,हे अनोखे दर्शन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चऱ्होली गावात दिसून येत आहे.