
बातमी 24तास (प्रतिनिधी) चाकण शहरा नजिक असणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कुल रोहकल या प्रशालेमध्ये, नेहमीच विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास समोर ठेवून, वैविध्यपूर्ण , अभ्यासात्मक, कलात्मक, व साहित्यात्मक उपक्रम हे नेहमीच राबवले जातात. त्या अनुषंगानेच विध्यार्थ्यांच्या अंगी असणारे, संशोधणात्मक कौशल्य जोपसण्यासाठी व त्यांची जिज्ञासू वृत्ती वाढावी हा मानस समोर ठेवून, प्रशालेचे प्राचार्य श्री.विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाने, प्रशालेतील विध्यार्थ्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रथम, कार्यक्रमास लाभलेले मुख्य अतिथी, श्री. शंकर वेताळसंशोधक, वाईंड टरबाईन डिझाईनश्री.मुथ्थुराज दक्षिणामूर्तीप्रोजेक्ट मॅनेजर, तथा, संशोधक डी. आर . डी .ओ. पुणे.प्रशालेचे प्राचार्य – श्री. विशाल जाधव.या मान्यवरांच्या शुभहस्ते, सरस्वती पूजन व दीप्रज्वलन करण्यात आले. व उपस्थित मान्यवर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सदर प्रदर्शनामध्ये, इयत्ता पहिली ते दहावीच्या पाचशे विध्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सदर प्रदर्शनामध्ये, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आग प्रतिबंधात्मक यंत्र, ठिबक सिंचन प्रणाली, सौर ऊर्जेवर चालणारी साधने, विजेची बचत, पवन ऊर्जा, वॉटर फिल्टरेशन, हायड्रॉलिक निर्मिती, आर्टिफिसियल इंटेलिजेन्स , विजेची बचत, आदी विषय व्यक्त करणारे प्रकल्प हे विध्यार्थ्यांनी सादर केले. तसेच यावेळी विध्यार्थ्यांनी, स्वतः तयार केलेल्या नावीन्यपूर्ण पाककृती ही, फूड सेक्शन मध्ये, सर्व पालक वर्ग यांच्यासाठी विक्रीस ठेवत, उत्तम पाककृतीचा ही प्रत्यय दिला.

सदर प्रदर्शनामध्ये, रेन वॉटर हार्वेस्टिंग , तसेच पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, हे प्रकल्प खास आकर्षण ठरले.सदर प्रदर्शनात प्रकल्प परीक्षणाचे काम , प्रशालेच्या विज्ञान विभाग प्रमुख, शिक्षिका, पूनम जाधव, शिक्षिका अमृता पोतदार, शिक्षिका माला महांती, बुद्धीसागर खरात, उप प्राचार्या शीतल जयस्वारा, वर्षा देशमुख यांनी पाहिले.यावेळी अतिथी, श्री.मुथ्थुराज दक्षिणामूर्ती यांनी प्रत्येक विध्यार्थ्याने विध्यार्थी दशेत असतानाच, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन, त्यादृष्टीने आपली वाटचाल करावी. तसेच डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा आदर्श नेहमी ठेवावा, व देशाच्या सेवेमधे योगदान द्यावे असे प्रतिपादन केले व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना,प्राचार्य श्री.विशाल जाधव यांनी, आजचे विध्यार्थी हे उद्याच्या आधुनिक भारताचे नेतृत्व करतील व त्यांना यशाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशाला ही नेहमीच कटीबद्ध राहील असे प्रतिपादन केले व उपस्थित विध्यार्थी पालक सर्वांना शुभेच्छा दिल्या.तसेचसदर प्रदर्शनामध्ये, विध्यार्थ्यांना, प्राथमिक व माध्यमिक विभागातून प्रत्येकी तीन क्रमांक देण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले. सदर प्रदर्शनाचे आयोजन, शालेय सांस्कृतिक विभागाने केले. तसेच सूत्रसंचालन, प्रशालेच्या कॉउंसेलर ऐश्वर्या सिंग यांनी केले.
यावेळी विध्यार्थी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.