बातमी 24तास
(आळंदी प्रतिनिधी, आरिफभाई शेख)
आषाढी वारी 2024 च्या निमित्ताने प्रशासनाची लगबग सुरू आहे.त्या निमित्ताने विविध स्तरावरील शासकीय विभागां नी सेवा सुविधा पुरवण्याबाबत बैठक बोलवण्यात आली होती.आणि वारीच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये महावितरण महामंडळाने गेल्या महिन्याभरापासून आळंदी शहरात विद्युत दुरुस्तीची देखभालीची कामे करण्यासाठी आठवड्यातील सुमारे चार शुक्रवारपासून आळंदी व परिसरातील वीज पुरवठा खंडित होत होता. त्यामध्ये काल आळंदीतील काही बांधकामामुळे विद्युत वाहिनी केबल ला अडथळा निर्माण झाला त्यामुळे संपूर्ण शहराची लाईट गेली परिस्थितीमध्ये जर वीज पुरवठा खंडित झाला तर त्वरित एम एस ई बी महावितरण विभाग आळंदी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आळंदी मध्ये काही बांधकामे सुरू आहेत त्या बांधकामामुळे काल रात्री ज्याप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला तसा होऊ यासाठी जेसीपी यंत्राच्या साह्याने विद्युत वाहिनी असलेल्या अथवा जवळपास मुख्य वाहिनी आहे याची जाणीव असतानाही कुठलेही खोदकाम केले जाऊ नये यात्रा काळात हे नियम पाळावे म्हणजे वारकरी भाविक पर्यायाने नागरिकांना या बांधकामांच्या अडथळ्यामुळे वीत पुरवठ्याच्या खंडित होण्याच्या त्रासापासून मुक्त राहता येईल याची काळजी घ्यावी.तसेच आता मात्र अखंड वीज पुरवठा होणार असून.आळंदीत क्षणभरही वीज खंडित होणार नाही. अशी ग्वाही आळंदीच्या महावितरण अभियंता यांनी दिली आहे. पालखी सोहळ्याच्या तयारी निमित्त दुरुस्ती देखभालीची काम पूर्ण करण्यात आली असून. इंद्रायणी नदीवरील पूर्वीच्या काळी असणाऱ्या विद्युत तारांना एबी केबलने जोडण्यात आले आहे तसेच आळंदी शहरात आषाढी वारी निमित्त पालखी तोळ्याची पूर्वतयारी म्हणून महावितरण आळंदी कडून शहरात विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे आता आळंदीत वीज जाण्याबाबत काही तक्रार असणार नाही. तसेच अखंडित वीज राहील याची खात्री दिली आहे तसेच आळंदी चरोली केळगाव येथील ग्राहकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले आहेत तसेच सर्व कामे पूर्ण करण्यात आले असतील एलटी लाईन वरील कामे अजून सुरू आहेत ती पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. परंतु आता आळंदीमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त क्षणभरही वीज खंडित केल्या जाणार नाहीत. अखंड वीज पुरवठा राहणार आहे ही आनंदाची बाब वारकरी भाविक आणि व्यापारी यांच्यासाठी आहे. एम एस सी बी आळंदी विभाग या कडून तसे घोषित करण्यात आले आहे.