
बातमी 24तास
चाकण, (कल्पेश भोई ) :
गेल्या दोन महिन्यांपासून चाकण-राक्षेवाडी- काळूस या रस्त्याचे काम लांबणीवर पडल्याने स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते योगेश आगरकर रत्नेश वैरागे, विकास परदेशी यांनी बातमी 24तास शी बोलताना सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की,सदर रस्त्याच्या कामावरून ठेकेदार व लोकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला आहे. चाकण-राक्षेवाडी-काळुस या मार्गाचे काम लवकर व्हावे, अशी मागणी नागरिकांची, विद्यार्थ्यांची, कामगार तसेच शेतकऱ्यांची आहे.


चाकण शहराततून -राक्षेवाडी-काळूस या गावांना दळणवळण साठी जोडणारा हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. हा मार्ग मोठ्या वर्दळीचा आहे. या मार्गावर चाकण महाविद्यालय, इतर शाळा, विद्यालय व इतर रहिवाशांची वस्ती आहे. या मार्गावरून शेतकरी बांधवाना शेतीमालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक चाकण बाजारात करण्यासाठी हा रस्ता आहे . या मार्गाचे काही अंतराचे काम चाकण नगरपरिषदेने फंडातून महात्मा फुलेनगर पर्यंत केलेले आहे. त्यानंतर पुढील काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. साधारणपणे शंभर मीटर मार्गाचे कॉक्रिटीकरणाचेकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. सुमारे दोन- तीन महिन्यांपासून सुरु झालेले हे काम काही वादामुळे लांबले आहे. काही मार्गाचे काम झालेले असून, फक्त दीडशे फूट मार्गाचे काम रेंगाळलेले आहे. या कामाच्या ठिकाणी काही जणांच्या जागेची मालकी सांगण्यात येत आहे. तसेच नऊ मीटर रुंदी ऐवजी सात मीटर रुंदी करावी, यावरून हा वाद निर्माण झाला आहे. ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याबाबत काही निर्णय घेत नाही, असाही आरोप नागरिकांचा आहे. बाकीचे काम नऊ मीटर रुंदीने केले. त्यामुळे येथेही नऊ मीटरने काम करावे, अशी काही लोकांची मागणी आहे. तर ज्यांची जागा या मार्गात जाते, त्या लोकांची मागणी या मार्गाचे काम कमी (सात) मीटर रुंदीने करावे, अशी आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.काही व्यक्ती जाणीव पूर्वक या रस्त्याच्या कामाला विरोध करत असून गेली दोन तीन महिने झाले असून त्या व्यक्तीने प्रशासनला वेठीस धरले आहे. या वर तातडीने तोडगा काढून या रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा स्थानिक रहिवाशी तीव्र आंदोलन करणार आहे. (रत्नेश वैरागे सामाजिक कार्यकर्ते )
गेले अनेक दिवस चाकण काळुस रोडवरील रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने चालू असलेलं काम गेले एक दीड महिना थांबले आहे., एकाच व्यक्तीमुळे काम थांबले, असं लोकांचं म्हणणं आहे, संबंधित काम का थांबलेले आहे ? या प्रश्नाचे उत्तर संबंधित विभागाने लोकांना सांगणं गरजेचं आहे.
(पै विकास परदेशी)
संबधित व्यक्तीची जागा रोड लगत अजिबात नाही त्याची जागा फक्त 825 स्केवर फुट आहे घरा शेजारी रोड लगत अतिक्रमण करून ब्लॉक बसवुन घेतले आणि आता 9 मीटर रोड चालू असताना त्याला आश्रमच्या बाजूला ब्लॉक असल्या मुळे तिकडे सरकायला जागाच नाही म्हणुन तो 7 मीटर लावून धरतोय सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी त्याची जागा मोजून उर्वरित जागे मध्ये आपले काम चालू करावे.
योगेश आगरकर (सामाजिक कार्यकर्ते)