(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) महावितरण कंपनीने मोठ्या प्रमाणात भरमसाठ वीज बिल वाढीबरोबर आता मात्र स्मार्ट कार्ड मीटरची एन्ट्री आळंदी मध्ये झालेली आहे. सामान्य वर्गातील कुटुंबाला स्मार्ट कार्ड मीटर परवडणार की ग्राहकांच्या खिशाची लूट होणार याबाबत प्रश्न कायम आहे. नवीन मीटर अथवा मीटर बाबत काही तक्रार असल्यास सरसकट तक्रार असणाऱ्या मीटर धारकांना स्मार्ट कार्ड मीटर बसावे लागणार आहे. जितक्या रुपयाचे रिचार्ज असेल तेवढा वेळ वीज चालू राहील रिचार्ज संपले की वीज खंडित होणार आहे सामान्य ग्राहकांना मात्र त्यांच्या खिशाला कात्री लावण्याची भावना निर्माण होत आहे. पूर्वीचे मीटर असावेत नवीन मीटर नको अशा भावना बऱ्याच ग्राहकांमध्ये आहेत. तसेच वीज खंडित बाबत काहीही तक्रार असेल किंवा भरमसाठ बिल येत असेल तर सुरुवातीला सदर स्मार्ट कार्ड विज मीटर या ग्राहकांना बसवणे अनिवार्य केले गेलेले आहे. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुरदंड भरावा लागणार आहे. मुळात वाढती महागाई बेरोजगारी अशा ज्वलंत प्रश्नानंतर रिचार्ज केलेले मीटर माथे मारणे हे मात्र नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याची चर्चा आळंदीकर ग्रामस्थांमध्ये आहे. काल दिनांक आठ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात स्मार्ट कार्ड असणारे वीज मीटर महावितरण केंद्र आळंदी येथे आणले आहेत. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये या स्मार्ट कार्ड वीज मीटर बाबत तीव्र नाराजी असून विरोधी होत आहे अशातच आळंदीतील ग्राहकांना नवीन वीज मीटर बसवण्याची केली जाणारी मागणी मध्यमवर्गीय कुटुंबातील घराचे आर्थिक बजेट कोसळणारे असेल असे वाटते.