
बातमी 24तास
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे कैलास केंद्रे या मुख्याधिकारी पदी असणाऱ्या अधिकाऱ्यांची पदोन्नती मिळत लातूरच्या महानगरपालिका उपायुक्त पदी निवड झाली आहे. माधव खांडेकर यांनी आळंदीत येताच माजी मुख्याधिकारी आणि आजी मुख्याधिकारी दोघांनी मिळून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदीच्या इतिहासामध्ये एवढा मोठा कौतुक सोहळा पूर्वी कधी झाला नाही. अशी नागरिकात चर्चा होत होती.दरम्यान आळंदी नगर परिषदेमध्ये पदभार स्वीकार केल्यानंतर माधवराव खांडेकर यांची आळंदीनगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी व पदोन्नती मिळून लातूर ठिकाणी उपायुक्त झालेले कैलास केंद्रे यांनी आळंदी कर्मचारी,सर्व स्टाफ यांची ओळख करून देऊन आळंदीच्या समस्येबाबत सुमारे दोन तीन तास खाजगी मध्ये चर्चा करत माहिती दिली आहे. आळंदीच्या समस्येचा पाढा वाचून दाखवत अपयश का येते याबाबतही माधव खांडेकर यांना कैलास केंद्रे यांनी माहिती दिलेली असण्याची शक्यता आहे.येणाऱ्या काळामध्ये बरेच मोठी आव्हाने नवीन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना स्वीकारावी लागणार आहे.