
बातमी 24तास (चाकण प्रतिनिधी) श्री हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण श्री समस्त बालविर मंडळ व स्व. रमणशेठ परदेशीेशी प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा सेवारत्न पुरस्कार यावर्षी राजेंद्र दत्तात्रय शिंदे सचिव दुर्गाई हृदय प्रतिष्ठान चाकण यांना देण्यात आला.स्वर्गीय रमणशेठ परदेशी यांनी त्यांच्या सामाजिक जीवनात लोकांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले चाकण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याचे काम केलं त्यांचं स्मरण होऊन समाजात चांगले काम करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत या यातूने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातोया हेतूने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.यावर्षी हा पुरस्कार राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांना बाजार समितीच्या सभापती विजयसिंह शिंदे चाकण नागरी पतसंस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ कांडगे व सर्व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला एवढी हभप मुक्ताची दादा नाणेकर कालिदास दादा वाडेकर अमृत नाना शेवकरी व चाकण मधील सर्व समाजातील सर्व लोक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा संयोजन राहुल परदेशी संदीप परदेशी, प्रशांत परदेशी यांनी केले व प्रास्तविक धीरज परदेशी यांनी केले.