एकतर्फी प्रेमातून मोटारसायकल वरील तरुणीवर कोयत्याने सपासप वार,सदाशिव पेठेत भरदिवसा थरार

Share This News

बातमी 24तास

(पुणे क्राईम रिपोर्टर) दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण तरुणीची एकतर्फी प्रेम प्रकारणातून झालेली हत्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात आज भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. तरुणीवर वार करत असताना तिथं उपस्थित असलेल्या दोन युवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणीचा जीव वाचवला आहे. त्यानंतर वार करणाऱ्या माथेफिरू आरोपीला चोप देत पोलीस चौकीत नेण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी १० वाजणेचे सुमारास घडला. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून,शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. मुळशी) असं कोयत्याने वार करणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी एक तरुणी आणि एका तरुणासोबत दुचाकीवरून पुण्यातल्या सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. त्याठिकाणी ते दोघे एकमेकांशी बोलत बोलत असताना आरोपी शंतनू जाधव तिथं आला आणि त्याने बॅगेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला. त्यानंतर शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.दरम्यान, या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत मुलीचा जीव वाचवला. त्यानंतर त्याला चोप देत पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेत दोघेही तरुण तसेच तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

*🟥टाटा स्काय ची धमाकेदार ऑफर ; लगेच फायदा घ्या फक्त 1500 रु मध्ये बसवा कनेक्शन आणि महिना भर मोफत*🟥 *ज्याच्याकडे टाटा प्ले आहे आणि त्याला त्याचा पॅक चेंज करायचा आहे तर मला कॉल करा 318 मध्ये सगळे चैनल ( एचडी चॅनल) पाहायला मिळतील मला कॉल करा आणि तुमचा टाटा प्ले चा पॅकेज चेंज करून घ्या**📞अधिक माहितीसाठी आताच सम्पर्क करा:**📱9420159059**📱8796164028*…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy