
बातमी 24तास
(योगेश गायकवाड) कुरळी परिसरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार दौऱ्याने संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले. गावोगाव, वस्तीवस्तींतून उसळलेला जनसमुदाय आणि जनतेतून उमटलेला एकसुरी आवाज —“आता पर्याय नाही, घड्याळालाच मत!”हा केवळ घोष नव्हता, तर आगामी निवडणुकीतील राजकीय चित्र स्पष्ट करणारा निर्णायक इशारा होता.
आजचा प्रचार दौरा हा निव्वळ निवडणूक प्रचार न राहता, विरोधकांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने जनमताची लाट उभी करणारा ठरला. राज्याचे अनुभवी नेते, विकासाचा चेहरा आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास पुन्हा एकदा उघडपणे व्यक्त झाला.“राजकारणात अनेक चेहरे आले-गेले, पण कुरळीच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे नेते म्हणून दादांची ओळख आहे. शब्द नाही, काम बोलतं आणि म्हणूनच आमचं मत ठरलेलं आहे,”अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून ऐकायला मिळाली.पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटार योजना, शैक्षणिक सुविधा, महिलांची सुरक्षितता आणि युवकांसाठी रोजगार या मूलभूत प्रश्नांवर विरोधकांनी केवळ घोषणा केल्या, तर राष्ट्रवादीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करून दाखवली, असा ठाम आरोप यावेळी जनतेतून व्यक्त झाला.“ज्यांनी संकटात साथ दिली, त्यांच्याच चिन्हावर बटन दाबणार,”हा निर्धार ग्रामस्थांनी उघडपणे मांडला.कुरळीतील प्रचारादरम्यान दिसलेली गर्दी, स्वयंप्रेरित सहभाग आणि जनतेतील आत्मविश्वास पाहता, हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेससाठी शक्तिप्रदर्शन ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग हे विरोधकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.आज कुरळीतून जो संदेश गेला आहे, तो स्पष्ट आणि ठाम आहे.
विकासावर बोलणाऱ्यांना नव्हे, विकास करून दाखवणाऱ्यांनाच संधी मिळणार.राजकीय समीकरणे बदलणारा हा जनकौल असून, येणाऱ्या निवडणुकीत कुरळीचा निकाल आधीच ठरल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.कुरळीतील आजचा दिवस केवळ प्रचाराचा नव्हता, तरराजकीय दिशा ठरवणारा, विरोधकांना वास्तवाची जाणीव करून देणाराआणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचा बिगुल वाजवणारा दिवसम्हणून ओळखला जात आहे.
मायबाप जनता बोलली आहे —आणि निकालाची दिशा ठरली आहे…घड्याळ ठरलयं!