आळंदीत शासन आपल्या दारीला मोठा प्रतिसाद,कल्याणकारी योजना तळागाळातील घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आमदार दिलिप मोहिते पाटील यांचे आवाहन

Share This News

बातमी 24तास

(प्रतिनिधी आरिफभाई शेख) आळंदी येथील फ्रूटवाला धर्मशाळा येथे महाराजस्व अंतर्गत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी या योजनेचा आज प्रारंभ झाला. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे यामध्ये महिलां, वृद्ध यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. शासनाच्या विविध योजनांची कामे यासाठी विवीध प्रकारच्या अडीअडचणी शासकीय कार्यालयात येतात त्यासाठी चकरा माराव्यां लागल्यामुळे कामे प्रलंबित राहतात. ते निकाली निघत नाहीत. त्यासाठी महाराजस्व अभियानात लाखो लोकांनी लाभ घेतला आणि काने मार्गी लागली असल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

आळंदीतील या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सर्वप्रथम शालेय मुलांसाठी असणारे उत्पन्नाचे दाखले, ईतर प्रमाणपत्र याबाबत प्रथम प्राधान्य देत काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुढील काळामध्ये पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा हे अभियान राबवले जावे आणि लोकांची कामे तातडीने मार्गी लावली जावीत. इतर लोकांप्रमाणे मी स्वतःच्या फायद्यासाठी येथे आलेलो नाही तर लोकांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात त्यांची कामे मार्गी लागेल यासाठी इथे आलेलो आहे याचे लोकांनी भान ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मागे ठामपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नागरिकांना मोठ्या प्रमाणावर शासकीय दालनात हेलपाटे मारावे लागतात. हा त्रास होऊ नये होण्यासाठी शासन आपल्यादारीची योजनेचा लोकांनी लाभ घ्यावा याबाबतही त्यांनी मनोगत व्यक्त केले आळंदीचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले तर डी.डी. भोसले पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमाला बबनराव कुऱ्हाडे. विलास घुंडरे. श्रीधर कुऱ्हाडे.अशोक कुऱ्हाडे. साहेबराव कुऱ्हाडे. ज्ञानेश्वर घुंडरे .संदेश तापकीर.ॲड सोहेल शेख.अनिकेत कुराडे निखिल बनसोडे.रोहन कुऱ्हाडे.निसार सय्यद. सचिन घुंडरे.पुष्पा कुऱ्हाडे. गौरी गोळे. रूपाली पानसरे. राणी रंधवे. लोकेशन आळंदीकर नागरिक महिला वृद्ध मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

*🟥टाटा स्काय ची धमाकेदार ऑफर ; लगेच फायदा घ्या फक्त 1500 रु मध्ये बसवा कनेक्शन आणि महिना भर मोफत*🟥 *ज्याच्याकडे टाटा प्ले आहे आणि त्याला त्याचा पॅक चेंज करायचा आहे तर मला कॉल करा 318 मध्ये सगळे चैनल ( एचडी चॅनल) पाहायला मिळतील मला कॉल करा आणि तुमचा टाटा प्ले चा पॅकेज चेंज करून घ्या**📞अधिक माहितीसाठी आताच सम्पर्क करा:**📱9420159059**📱8796164028*…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy