आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांचा रूट मार्च

Share This News

बातमी 24तास

(प्रतिनिधी, सम्राट राऊत ) गुरुवार दिनांक 29 च्या दिवशी आषाढी एकादशी व बकरी ईद सण एकाच दिवशी येत आहे. त्या पार्श्वभूमीवर चाकण पोलीस स्टेशनने आज दिनांक 26/06/2023 रोजी सायं. 07:15 वा. ते 08:10 वा. चे दरम्यान चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शहरा मध्ये आगामी आषाढी एकादशी व बकरी ईदच्या अनुषंगाने चाकण पोलीस स्टेशन – सुभाष चौक – जामा मस्जिद,बलुत आळी, गोल्डन चौक – खंडोबा माळ , महात्मा फुलेनगर , नेहरू चौक महात्मा फुले चौक, नगरपरिषद चौक, चाकण बाजारपेठ,माणीक चौक, असा मिश्र लोकवस्तीच्या भागात रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च दरम्यान पोलीस स्टेशन कडील 01 पोलीस निरीक्षक, 05 सपोनि / पोउनि , 37 पोलीस, अंमलदार तसेच आरसीपी चे 19 पोलीस आमंलदार असे हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy