
बातमी 24तास ( कल्पेश अ. भोई) चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या चौरंगी लढतीत नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांनी जोरदार मुसंडी मारून तब्बल १४,९०५ मते मिळवत एकतर्फी दणदणीत विजय मिळवला.
चाकण नगरपरिषदेच्या झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाने १३ जागा मिळवल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागांवर समाधान मानावे लागले.उबाठा मशाल गटाला १ आणि अपक्ष ला १ जागा मिळाली.निवडणूक जाहीर झाल्यानंतर बारा प्रभागांतील पंचवीस जागांपैकी तीन जागा बिनविरोध तर उर्वरीत २२ जागांसाठी ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.एकूण ३६ मतदान केंद्रावर ३३,१२५ मतदारांपैकी २४,६०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला होता. चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने शिवसेना, भाजप,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते.राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक बिनविरोध आणि शिवसेना शिंदे गटाचे एक नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते.
चाकण नगराध्यक्षपदी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेशभाऊ गोरे यांना १४,९०५ मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांचा ६,९६० मतांनी पराभव केला.चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – प्रभाग १ – साधना दीपक गोरे,प्रकाश लक्ष्मण गोरे व जयश्री विशाल नायकवाडी.प्रभाग २ – रुपाली राहुल कांडगे व रणजित सखाराम जरे. प्रभाग ३ – सुवर्णा श्याम राक्षे, अनिल इंदाराम लोहकरे.प्रभाग ४ – आरती प्रीतम परदेशी, प्रेम शिवाजी जगताप.प्रभाग ५- पूनम सुनील शेवकरी,नितीन गुलाब गोरे ( बिनविरोध ).प्रभाग ६ – स्वाती संतोष लेंडघर, हर्षद गेनभाऊ लेंडघर.प्रभाग ७ – वर्षा सुयोग शेवकरी (बिनविरोध ),सागर सुरेश बनकर.प्रभाग ८ – तृप्ती किशोर जगनाडे,आकाश ज्ञानेश्वर जाधव.प्रभाग ९ – अनिता श्रीराम घोगरे,मंगेश शिवाजी कांडगे.प्रभाग १० – विजया शिवाजी तोडकर,प्रकाश राजाराम भुजबळ ( बिनविरोध ).प्रभाग ११ – विजया दत्तात्रय जाधव,साहेबराव राजाराम कड.प्रभाग १२ – रेश्मा तुषार मुटके,धीरज प्रकाश मुटके हे निवडून आले आहेत.
मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक 12 मधील मशीन काही काळ बंद पडल्याने गोंधळाचे वातावरण निकालाची अद्यावत माहिती माध्यम प्रतिनिधींना वेळेत मिळत नसल्याने प्रशासनाचा निषेध
* मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावून गर्दीवर नियंत्रण
* निकालानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाऱ्याची मनसोक्त उधळण केली, मात्र मिरवणुकीवर बंदी असल्याने विजय उत्सव साजरा करण्यात काहीशा मर्यादा आल्या.