माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर हल्ला

Share This News

बातमी 24तास, प्रतिनिधी, दत्ता घुले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पाईट आंबेठाण गटाच्या उमेदवार सुनिता बुट्टे पाटील यांचे पती शरद बुट्टे पाटील आसखेड बु.(ता.खेड) येथील राहुल तरडे यांना यांच्या घरी भेटून आसखेड धामणे रस्त्याने वराळे(ता .खेड) मुक्कामी जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी दगडी मारुन हल्ला केला.

अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये गाडीची पुढील काच फुटली असून शरद बुट्टे पाटील यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाल्यावर रक्तदाब वाढल्याने भांबोली येथील बालाजी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. बुट्टे पाटील आणि त्यांचा मित्र संदिप मिरजे शुक्रवारी रात्री ८- ३० वाजता आसखेड धामणे रस्त्याने स्कार्पीओ नं एम एच १४ एलयू ७०७४ गाडीने वराळे (ता .खेड) कडे येत असताना अटकाव करण्याच्या उद्देशाने रस्त्यामध्ये दगडी लावून अंधारात दबा धरुन बसलेल्या दोन ते तीन अज्ञात इसमांनी गाडीवर दगडफेक करुन हल्ला केला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये शरद बुट्टे पाटील व त्यांचा मित्र जखमी झाला आहे. त्यांना पुढील उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान दगडफेक झाल्याची माहिती पाईट आंबेठाण गटात वाऱ्यासारखी पसरली. आणि बुट्टे पाटील उपचार घेत असलेल्या बालाजी हाॅस्पिटल परिसरात शेकडो कार्यकर्ते संतप्त भावनेने जमा झाले होते. यावेळी उत्तर महाळूंगे पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवून व पुढील अनर्थ टाळण्यासाठी बुट्टे पाटलांना घरी सोडण्यात आले. मतदानाच्या आदल्या रात्री अशा प्रकारे घटना झाल्याने पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटात तणाव निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy