
बातमी 24तास ( वृत्त सेवा )स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा खेड तालुका व निर्माण पॅरामेडिकल इन्स्टिटयूट यांच्या वतीने 6 डिसेंबर 2025 रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राजगुरूनगर येथे “एक वही एक पेन ” हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावरच सामाजिक, राजकीय, धार्मिक परिवर्तन घडवून आणले असून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुणारच असा संदेश आपल्याला बाबासाहेबानी दिला. असे सांगितले. तसेच गरीब गरजू विद्यार्थीना ही मदत पोहचविणारअसल्याचे संघटनेचे खेड ता. संपर्कप्रमुख हरीश कांबळे यांनी सांगितले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या “एक वही एक पेन ”या कार्यक्रमास अत्यंत छान असा प्रतिसाद नागरिकांनी दिला. याकार्यक्रमासाठी हरीश कांबळे ,इमरान शेख, सोनू काळे यांनी मेहनत घेतली स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संथापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, काँग्रेस पर्यावरण विभागाचे राज्य उपाध्यक्ष रज्जाकभाई शेख, राज्य सचिव दिलीप पालवे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विकासशिंदे, आय. टी सेल पुणे जिल्हा सोनू काळे, महिला कार्याध्यक्ष जयश्री शिंदे, खेड तालुका अध्यक्षा रेखाताई कोळेकर, खेड तालुका संघटक सोमनाथ लोंढे, खेड ता. सरचिटणीस इमरान शेख , खेड ता. उपाध्यक्ष इमरान हाशमी, प्रवक्ते ईश्वर इंगळे, चाकण शहर, कार्याध्यक्ष सुरेखा पालवे, इ.उपस्थित होते.