
बातमी24तास, चाकण (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी ॲड. मालिनीताई प्रितम शिंदे यांची भाजपा महिला मोर्चा, खेड तालुका (चाकण मंडल) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे महिला संघटन मजबूत होणार असून पक्षाच्या स्थानिक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे भाजपाचे खेड तालुका ( चाकण मंडल)चे अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी यावेळी सांगितले.

भाजप नेतृत्वाने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही जबाबदारी सोपवली आहे. महिला सशक्तीकरण, कायदेविषयक जनजागृती तसेच पक्ष संघटन विस्तारासाठी केलेल्या कार्यामुळे ॲड. मालिनीताई शिंदे यांची निवड करण्यात आल्याचे मेदनकर म्हणाले.नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना ॲड. मालिनीताई प्रितम शिंदे म्हणाल्या,“पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. खेड तालुक्यातील महिलांना संघटित करून त्यांना हक्क, शिक्षण व स्वावलंबनाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य देणार आहे.”या नियुक्तीबद्दल भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोर्चाच्या सदस्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, चाकण मंडलात महिला मोर्चाचे काम अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.लवकरच संघटन विस्तार, महिला मेळावे व विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या नियुक्तीमुळे खेड तालुका व चाकण परिसरात भाजप महिला मोर्चाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.