
बातमी 24तास(वृत्त सेवा) ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन २०२५ -२६ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून निवड झाली खेड तालुका विज्ञान प्रदर्शन ९ डिसेंबर व १० डिसेंबर २०२५ रोजी कडूस येथील रामभाऊ म्हाळंगी विद्यालयात संपन्न झाले. यावेळी ज्ञानवर्धिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अपघात प्रतिबंध प्रकल्प मांडला होता.
सद्यस्थितीत होणाऱ्या अपघात व त्यामुळे होणारे कौटुंबिक नुकसान, जे कुटुंब उध्वस्त होतात, जे मुलं अनाथ होतात त्यांच्या दृष्टीने याचा विचार करून त्यावर काय करता येईल आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्याला हे अपघात कसे टाळता येतील यासाठी हा प्रकल्प शिक्षकांच्या सहकार्याने बनविण्यात आला. यामध्ये चालकाने मद्यपान जर केलेल असेल तर लगेच कसे समजेल व जर चालकाला गाडी चालवत असताना झोप आली तर कसे कळेल किंवा गाडीचं सेंसर कसा आवाज देईल या सर्व गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पाची मांडणी करण्यात आली व या प्रकल्पाचा प्रथम क्रमांक आला नक्कीच याचा उपयोग पुढील काळात करण्यात येईल. व होणारे अपघात टाळता येतील. विद्यार्थ्यांनी प्रकल्पाची मांडणी अतिशय सुंदर व उपयोग व निष्कर्ष सुंदर रित्या मांडला. जर गाडीचा वेग मर्यादा नियमानुसार ठेवली तर अपघात टाळले जातील तसेच सीट बेल्टचा वापर करावा मद्यपान करून गाडी चालवू नये. गाडी चालवत असताना मोबाईल वर बोलू नये. या सर्व गोष्टी यामध्ये मांडण्यात आल्या. इयत्ता सातवीचे विद्यार्थी आदित्य गणेश कड व सार्थक गणेश सूर्यवंशी त्याच बरोबर इयत्ता ९ वी चा रोशन आढाव याने आधुनिक शेती हा प्रकल्प मांडला आणि इयत्ता ७ वी तील साई प्रमोद गायकवाड याने निबंध स्पर्धेत सह भाग घेतला. यावेळी मार्गदर्शक शिक्षक ज्योती दत्तात्रय लोंढे, सुनील नंदाराम वडेकर, छाया जोतिबा पठारे यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे व मुख्याध्यापिका प्रमिला गोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले