
प्रतिस्पर्ध्यांच्या माघारीमुळे शिंदे गटाचे बळ अधिक दृढ
बातमी 24तासचाकण ( प्रतिनिधी,दीपाली नवले) चाकण नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच्या उमेदवारांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. माघारीच्या प्रक्रियेदरम्यान अनेक प्रतिस्पर्धी उमेदवारांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने शिंदे गटाचे राजकीय समीकरण अधिक भक्कम होत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.माघारीनंतर अनेक प्रभागांमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार तुलनेने मजबूत स्थितीत दिसत आहेत. काही प्रभागांमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या माघारीमुळे थेट द्विपक्षीय लढत निर्माण झाली असून, शिंदे गटाला याचा थेट फायदा होत असल्याचे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे.

दरम्यान,शिंदे सेनेच्या उमेदवारांना चाकण नगरपरिषद निवडणुकीत माघार घेऊन वाढता पाठिंबा मिळाला यामध्ये सौ.योगिताताई योगेश आढारीयांनी नितीन गुलाबराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व किरण कौटकर , श्रीकांत जाधव, शहाजी राक्षे यांच्या सहकार्याने आपल्या हक्काच्याप्रभाग क्रमांक 03 मध्ये स्वतः थांबण्याचानिर्णय घेऊन मनाचा मोठेपणा दाखवत अनिल इंदाराम लोहकरेयांना जाहीर पाठिंबा दिला. किरणशेठ कौटकर व सौ. सोनलताई कौटकर यांनी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत व नितीन गुलाबराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रेवेश करुन आपल्या हक्काच्या प्रभाग क्रमांक 03 मध्ये स्वतः थांबण्याचा निर्णय घेऊन मनाचा मोठेपणा दाखवत सौ. सुवर्णाताई शाम राक्षे यांना जाहीर पाठिंबा दिला.


स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषाताई गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महेशशेठ आनंदराव शेवकरी व सौ.ऋतुजाताई विशाल शेवकरी धनंजयशेठ शेवकरी व सौ.सारिकाताई धनंजय शेवकरी यांनी नितीन गुलाबराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हक्काच्या प्रभाग क्रमांक 05 मध्येस्वतः थांबण्याचा निर्णय घेऊन मनाचा मोठेपणा दाखवत सौ.पूनम सुनिल शेवकरी यांना जाहीर पाठिंबा दिला.

निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर मनीषा ताई आणि नितीन गोरे यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेवून वरील सर्वांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.शिंदे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “चाकणकरांचा वाढता विश्वास, विकासाच्या दिशेने केलेली कामे आणि पक्षाच्या नेतृत्वाची कार्यशैली या जोरावर आम्हाला व्यापक पाठिंबा मिळत आहे.”प्रचार दौरे, पदयात्रा आणि घर-घर संपर्क मोहिमेदरम्यानही शिंदे गटाच्या उमेदवारांकडे लोकांचा ओघ वाढल्याचे दिसून आले आहे.माघारीनंतर प्रत्येक प्रभागात नवीन राजकीय गणिते तयार होऊ लागली असून, शिंदे सेनेचे संघटन आणि कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे आगामी मतदानात पक्षाला लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आता सर्वांचे लक्ष आगामी मतदानावर आणि अंतिम निकालावर केंद्रीत झाले असून, शिंदे सेनेच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद हा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरू लागला आहे.