
बातमी 24तास चाकण (प्रतिनिधी) राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून चाकण शहर व परिसरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकारांचा याप्रसंगी चाकण शहर व परिसरातील कल्पेश भोई, चंद्रकांत मांडेकर,संजय बोथरा,अविनाश राळे,हनुमंत देवकर, अतिश मेटे या पत्रकारांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात विविध दैनिके, साप्ताहिके, वृत्तवाहिन्या व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना भाजपाचे चाकण मंडलचे अध्यक्ष भगवान मेदनकर म्हणाले की,“पत्रकार हा समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. अन्याय, भ्रष्टाचार, जनतेच्या समस्या समोर आणण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात. त्यामुळे लोकशाही सक्षम राहते.”पत्रकारांच्या प्रामाणिक लेखनामुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटते, प्रशासन जागे होते आणि जनतेला न्याय मिळतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) चाकण शहराध्यक्ष राम गोरे यांनी नमूद केले.अडचणी असूनही पत्रकारांचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहनयावेळी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पत्रकारांनी निर्भीडपणे बातम्या देताना सामाजिक सलोखा जपावा, तसेच सकारात्मक व विकासाभिमुख पत्रकारितेला चालना द्यावी, असे आवाहन चाकणचे माजी उपसरपंच, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी केले. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहिल्यास शहर व परिसराचा सर्वांगीण विकास शक्य होईल, असेही यावेळी म्हणाले.कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ पत्रकार संजय बोथरा आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, वाढत्या ताणतणावात, संसाधनांच्या मर्यादांमध्ये आणि अनेक अडचणींना सामोरे जात असूनही सत्य आणि जनहितासाठी पत्रकार आपले काम निष्ठेने करत आहेत. समाजाने व प्रशासनाने पत्रकारांच्या सुरक्षिततेकडे आणि हक्कांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही बोथरा मत यांनी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाला अजय जगनाडे, प्रीतम शिंदे, अर्जुन बोराडे, धीरज वाळुंज, पंढरीनाथ सुतार,किशोर भुजबळ, अरुण जोरी, संदेश जाधव, दत्ता परदेशी,गणपती गौडा पाटील, योगेश देशमुख,नसीम पठाण, आशिष शेवकरी,मंगेश देसाई,किरण इंगळे,डॉ. विजय खरामाटे,अनिल देशमुख,दत्ता चौधरी, गौतम ओव्हाळ तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश जाधव व आभार प्रदर्शन मोबीन काझी यांनी केले.