
बातमी 24तास
चाकण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक शिवसेनाचा गुलाल उधळाला प्रभाग क्र. ५ ब मधून स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू शिवसेना मुख्यनेते एकनाथभाई शिंदे यांचे विश्वासू शिलेदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवार गुलाबशेठ लक्ष्मण शेवकरी यांनी जाहीर पाठिंबा देऊन माघार घेतली. त्यांचे स्वागत बाजार समिती संचालक माणिकशेठ गोरे यांनी केले.
जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनिषाताई सुरेशभाऊ गोरे, नितीनभाऊ गोरे यांनी गुलाबशेठ शेवकरी, अनिलशेठ शेवकरी, विष्णू शेवकरी, उमेश शेवकरी, निलेश शेवकरी, सुनील शेवकरी, पूनम शेवकरी यांना कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. यावेळी बाजार समिती माजी संचालक पांडुरंग बनकर, नगरसेवक प्रवीण गोरे, निलेश गोरे, महेश शेवकरी, चेअरमन नवनाथ शेवकरी, गिरीश गोरे, रविंद्र शेवकरी, सुनील नायकवाडी, योगेश गोरे, सागर गोरे सर्व नगरपरिषद उमेदवार नागरिक मोठया संख्यने उपस्थित होते.