
बातमी 24तास (वृत्त सेवा) चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण प्रचार फेरी पूर्ण झाली. प्रभाग क्र. १ आणि ७ च्या प्रचाराचा शुभारंभ चाकण शहरातील प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार सौ. जयश्री विशाल नायकवाडी, सौ. साधना दिपक गोरे, श्री. प्रकाश लक्ष्मण गोरे आणि प्रभाग क्र. ७ चे उमेदवार सौ.पल्लवी निलेश टिळेकर, श्री. महेश मोरेश्वर शेवकरी यांच्या सह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ दावडमळा येथील सावतामाळी मंदिर व महात्मा फुले चौक येथील गणपती मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य आणि प्रभाग क्र. ५ चे उमेदवार नितिनभाऊ गोरे, पोलीस पाटील वसंतराव गोरे, सोसायटीचे मा. चेअरमान भरत गोरे, संचालक सर्जेराव गोरे, सामाजिक कार्यकर्ते संजय नायकवाडी, चाकण पतसंस्था चेअरमन नवनाथ शेवकरी, व्हा चेअरमन गिरीश गोरे, नगरसेवक प्रवीण गोरे, निलेश गोरे, डॉ.कोठारी, सावता शेवकरी, मा. चेअरमन सहादू कड, प्रकाश गोरे, राजेश जाधव आणि कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

यावेळी मनिषाताई गोरे, नितीनभाऊ गोरे यांनी शिवसेना पक्ष आणि मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून चाकण शहरातील नियोजीत संकल्पना स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विचारातील चाकण शहर त्यातील मूलभूत रस्ते, पाणी, गटर, कचरा निर्मूलन याबरोबरच आवश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधा, क्रिडांगण, नाट्यगृह, कचरा विघटन केंद्र, युवा उद्योजक केंद्र, पर्यायी प्रशस्त रस्ते, मेट्रो या शाश्वत असणाऱ्या गोष्टी करण्यासाठी आपण मत रुपी आशीर्वाद देऊन आदर्श चाकण घडविण्यासाठी शिवसेना पक्षावर विश्वास व्यक्त करून चाकण शहरातील सर्व उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.