
बातमी 24तास
चाकण, (प्रतिनिधी,अतिश मेटे) : भारतीय जनता पार्टी चाकण मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये जुन्या अनुभवी पदाधिकाऱ्यांसोबत नव्या कार्यकर्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमास पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद, मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर, राम गावडे, उपसभापती क्रांती सोमवंशी, प्रिया पवार, ताराचंद कराळे, अनिल सोनवणे, संदेश जाधव, दत्ता खांडेभराड, शांताराम भोसले, कालिदास वाडेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी तर्फे सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पक्षाचा विचार चाकण शहरासह ग्रामीण भागात तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले.
जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पक्षाची खरी जबाबदारी लोककल्याणात आहे. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्राधान्याने करावे.”यावेळी उपसभापती क्रांती सोमवंशी, प्रिया पवार आणि शांताराम भोसले यांनीही आपले विचार व्यक्त करून कार्यकर्त्यांना उत्साह दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय जगनाडे यांनी मानले. जुन्या-नव्यांच्या सहभागातून सजलेली ही कार्यकारिणी आगामी काळात चाकणमधील भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



