भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले – पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याचा स्थिर पुरवठा कायम

Share This News

बातमी 24तास

चाकण(प्रतिनिधी,योगेश गायकवाड) : भामा आसखेड धरण आज दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता शंभर टक्के क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात झालेल्या पावसामुळे तसेच सतत येणाऱ्या पाणलोटामुळे धरणातील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. धरणाची सद्यस्थिती• जलसाठा पातळी (Reservoir Level): 671.50 मीटर• एकूण संचय (Total Storage): 230.647 दशलक्ष घनमीटर (8.14 TMC)• जिवंत साठा (Live Storage): 217.125 दशलक्ष घनमीटर (7.67 TMC)• क्षमता टक्केवारी: 100%मागील वर्षी याच दिवशी धरणातील जिवंत साठा 217.125 दशलक्ष घनमीटर (7.67 TMC) होता, म्हणजेच शंभर टक्के क्षमता भरलेली होती. यावर्षीही नेमक्या त्याच पातळीवर धरण भरल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.• कालचा पाऊस: 4.00 मि.मी.• आतापर्यंतचा एकूण पाऊस: 928.00 मि.मी. विसर्ग व पाण्याचा पुरवठा :-• स्पिलवे डिस्चार्ज (Spillway): 1228 क्यूसेक• ICPO विसर्ग: 00.00 क्यूसेक• इतर विसर्ग: 00.00 क्यूसेक• आजचा इनफ्लो: 2.160 दशलक्ष घनमीटर• १ जूनपासून एकूण इनफ्लो: 199.006 दशलक्ष घनमीटरसध्या धरणातून 1228 क्यूसेक पाणी स्पिलवे द्वारे सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भामा आसखेड धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे येणाऱ्या हंगामात पिण्याचे पाणी तसेच सिंचनासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, सततचा पाऊस आणि वाढता इनफ्लो लक्षात घेता विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy