
बातमी 24तास
राजगुरूनगर(प्रतिनिधी,अनिल राक्षे) आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकतेची किंमत जपणारे थोर उदाहरण सायगाव ता. खेड या गावातील तरुण भरत दत्तात्रय बडदे यांनी घालून दिले आहे.
डुडुळगाव आळंदी येथील एका महिला भगिनींचा अडीच तोळे वजनाचा सोन्याचा दागिना भरत यांच्या रिक्षामध्ये सापडला. ही बाब लक्षात येताच भरत यांनी कोणताही विलंब न करता प्रामाणिकतेचे व माणुसकीचे दर्शन घडवत तो दागिना थेट संबंधित महिलेच्या घरी जाऊन परत केला.भरत यांचा हा आदर्श कृतीमुळे गावभर कौतुकाची लाट उसळली आहे. नागरिकांनी त्यांच्या प्रामाणिकतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, “भरतसारखे तरुण समाजात प्रामाणिकतेचे संस्कार रुजवणारे आहेत” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भरत बडदे यांच्या या कृतीस सर्व समाजाकडून सलाम.

