
बातमी 24तास चाकण,
( प्रतिनिधी, अतिश मेटे) डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड युथ सर्व्हिसेस, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने प्रती वर्षी अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगानेच, चाकण शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल रोहकल या प्रशालेमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी अश्विनी हातरगे (DSO Pune क्रीडा अधिकारी .)दीप्ती शिदोरे (आंतराष्ट्रीय चेस आर्बिटर)अभिजित महाजन(जनरल मॅनेजर पोदार एजुकेशन नेटवर्क पुणे रिजन -1), विशाल जाधव (प्राचार्य पोदार इंटरनॅशनल स्कुल रोहकल),राजेंद्र कोंडे ( जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य चेस असोसिएशन तसेच सचिव पुणे जिल्हा चेस असोसिएशन) नितीन शिवाजी वरकड(अध्यक्ष खेड तालुका क्रीडा संघटना)दीपा कासवा(शिक्षक पालक संघ सदस्या) या मान्यवरांच्या शुभहस्ते, दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
यामध्ये 14 वर्षाखालील मुले- मुली17 वर्षाखालील मुले- मुली ,19 वर्षाखालील मुले- मुली या वयोगटातील खेड तालुक्यातील एकूण सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या मध्ये स्पर्धेसाठी, ऑर्बिटर (रेफरी) म्हणुन, गुरुजीत सिंग क्रीडा शिक्षकसिद्धार्थ सरोदेधीरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या भव्य तालुका स्तरीय बुद्धिबळ – चेस स्पर्धेत खेड तालुक्यातील तब्बल 130 शाळांनी आपला सहभाग नोंदविला यामध्ये 14 वर्ष मुले – मुली,17 वर्ष मुले – मुली, 19 वर्ष मुले – मुली,या वयोगटामध्ये एकूण तब्बल 588 (पाचशे अठ्ठयांशी ) विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून बुद्धिबळाचे उत्कृष्ट कर्तब दाखवले. व वरील नमूद सर्व वयोगटातून, विविध शाळातील 30 विध्यार्थी हे पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. या सर्व पात्र विध्यार्थ्यांचा सायंकाळी पोदार इंटरनॅशनल स्कुल रोहकल प्रशालेच्या वतीने, उपस्थित मान्यवर अजित थिगळे, (उद्योगपती खेड), प्रियांका थिगळे,नितीन वरकड, गुरुजीत सिंग, लहू लांडे ( उद्योजक खेड ), यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला व सर्व यशस्वी विध्यार्थी यांना पुढील वाटचालीसाठी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना मुख्य अतिथी, अश्विनी हातरगे . क्रीडा अधिकारी यांनी, उपस्थित सर्व विध्यार्थी पालक यांना, क्रीडा क्षेत्रातील करियर च्या निरनिराळ्या संधी यावर मार्गदर्शन केले व उपस्थित सर्वांना स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांनी यावेळी बोलताना, प्रत्येक विध्यार्थ्याने आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी उत्तम आणी सात्विक आहार घ्यावा तसेच आपल्या सर्वांगीन विकासासाठी अभ्यासाबरोबरच रोज नियमित पणे योग तसेच कोणताही एक खेळ हा नियमित पणे खेळावा असे प्रतिपादन केले.व उपस्थित सर्वांना स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, ऍडमिन विभाग ,क्रीडा शिक्षकसिद्धार्थ सरोदे धीरज पाटील व क्रीडा विभाग या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन शालेय सांस्कृतीक विभागाने केले. तसेच स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रशालेचे विध्यार्थी कु. सिद्धी कांबळे, कु. शौर्य चौधरी, शिक्षक विवेक पिसाळ यांनी केले.यावेळी विध्यार्थी शिक्षक पालक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

