
बातमी 24तास,लोणावळा(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेची 4 थी वार्षिक सर्वसाधारण सभा लोणावळा – कामशेत येथील रत्ना रिसॉर्ट येथे उत्साहात संपन्न झाली.
सदरील सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, आयुक्त अभिषेक कृष्णा, मुख्याधिकारी संघटनेचे सचिव प्रशांत रसाळ यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी माजी उपायुक्त सुधीर राऊत, नगरपरिषद / नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे संस्थापक के. के. आंधळे,प्रदेशाध्यक्ष डी.पी.शिंदे आदींनी मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास चव्हाण, सचिव मनोज पाटील व कार्याध्यक्षा ऍड. तृप्ती भामरे आदींनी सदस्यांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून विविध नगरपरिषद व नगरपंचायती तसेच इतर कार्यालयातील संवर्ग अधिकारी मोठया संख्येने सामील झाले होते. यावेळी संघटना कार्यात योगदान देणाऱ्या विविध सदस्यांचा उत्कृष्ट कामगिरीपर सन्मान करण्यात आला. तसेच आगामी वर्षात संघटनेची दिशा व ध्येये निश्चित करण्यात येऊन त्यादृष्टीने कामकाज करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. पुणे विभागीय व जिल्हा कार्यकारिणी यांनी सदरील सभेसाठी जय्यत तयारी केली होती त्यात प्रामुख्याने पुणे विभाग अध्यक्ष सुनिल गोर्डे,पुणे जिल्हा अध्यक्ष, घटना समीती सदस्या श्रीमती- ममता राठोड, पुणे जिल्हा अध्यक्षा श्रीमती कल्याणी लाडे यांनी अंत्यंत काटेकोर पणे नियोजन केले होते. सूत्रसंचालन सिद्धार्थ महाजन व रमेश कोळी यांनी केले.
