
बातमी 24तास ( प्रतिनिधी,योगेश गायकवाड ) : दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता भामा आसखेड धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणामध्ये नवीन येवा अत्यल्प प्रमाणात येत आहे. त्यामुळे आधी सांडवावरून भामा नदीपात्रात सुरू असलेला 1207 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी पूर्णपणे बंद करण्यात आला.
कार्यकारी अभियंता जाधव (चासकमान पाटबंधारे विभाग, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून पुन्हा विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व गावकऱ्यांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.भामा आसखेड धरणातून विसर्ग बंद झाल्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी स्थिर होण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, पुढील परिस्थिती पावसाच्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे.
जाहिरात 👇👇

