शिवसेना शिंदे (गट )शिरूर लोकसभा मतदारसंघाची महत्वाची बैठक

Share This News

बातमी 24तास ( चाकण प्रतिनिधी अतिश मेटे ) : शिंदे गट शिवसेना पक्षाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी चाकण येथील हॉटेल चाकण ग्रँड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची रणनिती निश्चित करण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे जिल्हा समन्वयक मंगेश सातमकर उपस्थित होते. त्यांनी पक्ष संघटन कसे अधिक सक्षम करता येईल, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय कसा वाढवता येईल तसेच कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या कार्यपद्धती अवलंबता येतील यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषत: ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी थेट संवाद साधून पक्षाची विचारधारा व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्व अधोरेखित केले.बैठकीदरम्यान पक्षाचे ध्येय-धोरण, मतदारांशी नाते दृढ करण्याच्या रणनिती, तसेच आगामी निवडणुकांसाठी आखली जाणारी तयारी या विषयांवरही विचारविनिमय झाला. कार्यकर्त्यांना सक्रियपणे जनतेत जाऊन संवाद साधण्याचे तसेच स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस उपनेते तथा कामगार नेते इरफान सैय्यद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ सदस्य नितीन गोरे, माजी जि.प. सदस्य व जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उल्हास तुपे,उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ज्योती आरगडे, युवा सेना जिल्हाप्रमुख धनंजय बापू पठारे, महादेव लिंभोरे, रावसाहेब नाणेकर, तालुकाप्रमुख निलेश पवार, विशाल पोतले, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, विभाग प्रमुख राहुल थोरवे, युवा सेना चाकण शहर प्रमुख अभिजित जाधव तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा, आत्मविश्वास व लढाऊ वृत्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक सक्षम व संघटितपणे उभी राहील, असा ठाम विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy