
बातमी 24तास
चाकण( प्रतिनिधी :अतिश मेटे): डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंबेठाण (ता.खेड) येथे आयडील लॅब तयार करण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते (दि.२२) ऑनलाइन पद्धतीने या लॅबचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मृण्मय काळे,माजी सरपंच सुभाष मांडेकर,दत्तात्रय मांडेकर,पोलीस पाटील तृप्ती मांडेकर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन मांडेकर,अनिता पडवळ,लता उनवणे,मानसी नाईकनवरे,मुख्याध्यापक रोहिदास येळवंडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये आयडील लॅबची निर्मिती करण्यात येत आहे.या योजने अंतर्गत आंबेठाण शाळेत आयडील लॅबची निर्मिती करण्यात आली आहे.२५ संगणक शाळेत बसवून डिजिटल रूम तयार करण्यात आली आहे.या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने अध्ययन – अध्यापन करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. तसेच ऑनलाइन कॉन्फरन्सद्वारे इतर ठिकाणी संवाद साधणे,ऑनलाइन अध्ययन करणे, शिक्षकांच्या ऑनलाइन मिटिंग यासाठी मदत होणार आहे.