
बातमी 24तास
आळंदी (प्रतिनिधी आरिफ शेख) वारकरी सांप्रदायाच्या नावलौकिकास डाग लागणेचे काम काही तथाकथित महाराजांकडून होत असेल तर आळंदीकर गप्प बसणार नाही.अशी भूमिका घेत,संग्राम भंडारे च्या वादग्रस्त वक्तव्याचा आळंदीतील महाद्वार चौकामध्ये सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले.या निषेध आंदोलनामध्ये तीव्र भूमिका मांडत माजी सभापती डी. डी.भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर,शिवसेना नेते उत्तम गोगावले, माजी नगरसेवक आनंद मुंगसे,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट अध्यक्ष विलास कुऱ्हाडे, अजित पवार गट शहराध्यक्ष सौरभ गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. मनोज राका, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष नंदकुमार वडगावकर.उद्योगपती माऊली कुऱ्हाडे. सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सतीश उर्फ बापू कुऱ्हाडे.सागर रानवडे,महेश कुऱ्हाडे,माऊली घुंडरे, प्रकाश घुंडरे मंगेश आरू,प्रसाद बोराटे,आदी उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील कीर्तनाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधाना बद्दल संग्राम भंडारे ने केलेल्या वक्तव्या बाबत तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विषयी असणारे विधान केल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.तसेच संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जन्म शताब्दी सोहळ्याचा काळ चालू असताना.स्व स्वार्थ साधण्यासाठी अशा व्यासपीठाचा वापर केला जात असल्याबाबत आळंदीकर ग्रामस्थ यांच्यावतीने संताप व्यक्त करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांनी जातीभेद कधी पाळला नाही तसेच हिंसेच उदाती करण ही केले नाही. असे असताना नारदाच्या गादीचा अपमान करत प्रथा परंपरा पाळल्या जात नसल्याचा आक्षेप आळंदीकर ग्रामस्थांचा आहे.याबाबत निषेध नोंदवत आळंदीतील सर्वपक्षीय तसेच ग्रामस्थांनी महाद्वार चौकातून निषेध करत आळंदी पोलीस स्टेशन येथे सदर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संग्राम भंडारे याच्यावर त्वरित कारवाई करावी असे सह्यांचे निवेदन दिलेले आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आळंदीच्या महाद्वार चौकामध्ये ग्रामस्थांनी सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र येत या निषेध सभेचे आयोजन केले होते.यामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांनी पुढाकार घेत या चुकीचे प्रथा चालत असल्याबाबत निषेध व्यक्त केला आणि आवाहन केले होते. नारादाच्या गादीचा अपमान या पुढच्या काळामध्ये आळंदीकर सहन करणार नाही तसेच याबाबत आळंदी पोलीस स्टेशन यांनी दक्षता घेत योग्य कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी आळंदीकर पर्यायने सर्वपक्षीय निषेध सभेचे आयोजक यांनी केलेले आहे.