
बातमी 24तास
चाकण,( कल्पेश भोई) श्रावण महिन्यानिमित्त श्रीक्षेत्र कुंडेश्वर ( पाईट तालुका खेड ) येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पिक अप गाडीचा अपघात होऊन सात महिला मृत्युमुखी पडल्या, तर सुमारे 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत घाटाच्या उतारावर गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की ( पापळवाडी तालुका खेड ) येथील 35 – 40 महिला भाविक, मुले, मुली असे प्रवासी मालवाहू पीक अप गाडीने दर्शनासाठी पाईट जवळील कुंडेश्वर येथील महादेव मंदिराकडे जात असताना घाट रस्त्यावरील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी पुढे जाण्याऐवजी मागे सरकू लागली. चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. जखमींवर पाईट रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचार साठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील मृतदेहांचे शव विच्छेदन चांडोली रुग्णालयात करण्यात आले. पाईट येथे झालेला पीक अप गाडीचा अपघात (नातेवाईकांना मदतीसाठी माहिती) मयत नागरिक महिला१) शोभा ज्ञानेश्वर पापड२) सुमन काळूराम पापड३) शारदा रामदास चोरगे४) मंदा कानिफ दरेकर५) संजीवनी कैलास दरेकर६) मिराबाई संभाजी चोरगे७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर८) शकुंतला तानाजी चोरघे (ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे पोस्टमार्टम सुरू आहे)उपचार घेत असलेले नागरिक# पाईट येथे स्थानिक पातळी उपचार झालेले नागरिक१) अलका शिवाजी चोरघे २) रंजना दत्तात्रय कोळेकर ३) मालुबाई लक्ष्मण चोरघे ४) जया बाळू दरेकर # पोखरकर हॉस्पिटल खेड ५) लता ताई करंडे ६) ऋतुराज कोतवाल ७) ऋषिकेश करंडे ८) निकिता पापळ ९) जयश्री पापळ # गावडे हॉस्पिटल खेड१०) शकुंतला चोरगे ११) मनीषा दरेकर # शिवतीर्थ हॉस्पिटल खेड१२) लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर १३) कलाबाई मल्हारी लोंढे १४) जनाबाई करंडे १५) फसाबाई सावंत १६) सुप्रिया लोंढे १७) निशांत लोंढे # केअर वेल हॉस्पिटल चाकण १८) सिद्धी ज्ञानेश्वर पापळ # बांबळे हॉस्पिटल खेड१९) कविता सारंग चोरगे २०) सुलाबाई बाळासाहेब चोरगे २१) सिद्धीकार रामदास चोरगे २२)छबाबाई निवृत्ती पापळ # साईनाथ हॉस्पिटल भोसरी २३) सुलोचना कोळेकर २४) मंगल शरद दरेकर २५) पुनम वनाची पापळ२६) जाईबाई वनाजी पापळ # साळुंखे हॉस्पिटल खेड २७) चित्रा शरद करंडे २८) चंद्रभागा दत्तात्रय दरेकर २९) मंदा चांगदेव पापळ पाईट गावा जवळच असणाऱ्या पाईट ग्रामपंचायत हद्दीतील पापळवाडी या वस्तीवरील हे भाविक होते. ४० – ४२ घरांच्या वस्तीला पापळवाडी असे म्हटले जाते. भीषण अपघाताच्या दुर्घटनेने पापळवाडीच नव्हे तर पाईट परिसरावर शोक कळा पसरली आहे. या अपघातात 9 महिलांचा मृत्यू झाला असल्याने प्रचंड दुःखावेगामुळे कोणीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.छबाबाई निवृत्ती पापळ वय 65 ( मृत महिला )
पाईट-खेड येथील अपघाताची घटना दुर्दैवी;अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत उपमुख्यमंत्री अजित पवारअपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरु;
मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करत, या कठीण प्रसंगात शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहे, असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन या संकटाच्या काळात अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार दिली आहे.