
बातमी 24तास
खेड /आळंदी (प्रतिनिधी आरिफ शेख) : खेड तालुक्यातील अतिशय दुःखद घटना म्हणून पुढे आलेल्या कुंडेश्वर अपघाताची राज्यभरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम मध्ये अध्यक्ष ऍडव्होकेट वैभव कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दहा महिलांचा यामध्ये मृत्यू झाला असून इतर अत्यावस्त आहेत.
श्री तीर्थक्षेत्र कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी महिलांना घेऊन जाणारी पिकअप वाहन चढावर ताबा सुटल्याने दरी मध्ये पडली.यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. याबाबत दुःख व्यक्त करण्यासाठी ॲड.वैभव कर्वे यांनी व कार्यकारिणी यांनी पुरुष बार रूममध्ये शोकसभेचे आयोजन करत दुःख व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य भर श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.