
बातमी 24तास
चाकण (प्रतिनिधी,अतिश मेटे) ऐतिहासिक आणि पारंपरिक असलेल्या चक्रेश्वर मंदिरात सध्या सुरु असलेल्या श्रावण मास निमित्ताने भक्तांचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही धार्मिक श्रद्धा आणि परंपरेशी निगडीत या मंदिराच्या परिसरात रोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.या भक्तिभावाच्या वातावरणात अमरनाथ सेवा मंडळ गेली १८ वर्ष श्रावण मास निमित्ताने दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांसाठी मंडळाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येते. भाविकानांकडून त्यांच्या कामाचे कौतुकहोत आहे.अमरनाथ सेवा मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत उत्साही वातावरणात भाविकांचे स्वागत करत असतात. मंडळाने केवळ धार्मिक कार्यक्रमातच नव्हे, तर सामाजिक कार्यातही मोठा सहभाग घेतला आहे. लवकरच श्री जोतिबा मंदिर, कोल्हापूर येथे धर्मशाळा बांधकाम करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.स्थानिक पातळीवर विविध सामाजिक उपक्रम, गरजूंची मदत, धार्मिक सोहळ्यांचे आयोजन अशा अनेक कार्यातून अमरनाथ सेवा मंडळाने आपली ओळख निर्माण केली आहे.