
बातमी24तास
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख ) आळंदी, : खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील वाढ यामुळे आळंदीकर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते त्यांनी ठिय्या आंदोलन करत आळंदी पोलिसांना पर्यायने महिला व बालकल्याण आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांना अध्यादेश काढायला लावले.कारवाई सुरू झाली.मात्र या प्रक्रियेला वेगळे वळण देण्याच्या कारणास्तव एका संस्थाचालक बुवावर आळंदी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
सदर बाबत हकीकत अशी की आळंदी ही वैष्णवांची भूमी आहे.येथे कधीही जातीभेद मानत नाही पर्यायाने आळंदीत जातीयवाद कधी नव्हता आणि नाही यावर आळंदीकर ग्रामस्थ ग्वाही देतात.दरम्यान लैंगिक अत्याचाराच्या अल्पवयीन मुलांवर झालेल्या प्रकाराच्या कारवाईनंतर एका संस्थाचालक बुवा ने आम्ही जिहाद विरोधात काम करतो.आम्ही हिंदुत्वाचे काम करतो.त्यामुळे आमच्या संस्थांचा सर्वे करायला लावला यामागे धर्म विघातक घटक आहेत याचा बोलविता धनी कोण तो शोधायचा असे पुढारी स्टाईल ने व्हिडिओ क्लिप व्हायरल केली. तसेच भीती दाखवणे सारखी परिस्थिती निर्माण व्हावी असेही वक्तव्य केले.सदर प्रकारामुळे आळंदीकर ग्रामस्थ प्रचंड संतापले.आळंदीमध्ये कधीही जातिवादाला थारा दिला गेला नाही.याबाबत वारंवार आळंदीकर युवक आणि ग्रामस्थांनी जाहीररित्या सांगितले आहे.आणि त्यातच अशा प्रकारचा व्हिडिओ या संस्थाचालक बुवाने प्रसिद्ध केला त्यामुळे प्रचंड संतापलेले आळंदीकर ग्रामस्थ यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले.अत्याचार झालेल्या लहान मुलांना न्याय देण्यासाठी आळंदीकर ग्रामस्थ करत असलेल्या प्रयत्नांना यश येत असून सदर वारकरी खाजगी शिक्षण संस्था अत्याचार तपासणी यामध्ये जातीवादाची कुठली भूमिका नसताना असे वेगळे वळण देण्याचे कारण काय असा संतप्त सवाल आळंदीकर ग्रामस्थांनी विचारत आळंदी पोलीस ठाण्यामध्ये संस्थाचालक बुवा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सदर अर्जामध्ये म्हटले आहे की आळंदीतील सामाजिक एकोपा बिघडवण्याची आळंदीतील शांतता भंग होण्याची भीती आहे त्याचबरोबर धार्मिक तेढ निर्माण करून एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न या वायरल व्हिडिओ क्लिप मुळे करण्याचा प्रयत्न होत आहे.सदर प्रकरणाला विनाकारण धार्मिक वेगळे वळण देऊ नये अशी समज आळंदी पोलीस स्टेशनकडून देण्यात यावी याबाबत आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज केला आहे.तसेच संबंधित तक्रार दाखल करण्यात आलीय. यापूर्वी सदर संस्थाचालक बुवाने आक्षेपार्ह वादग्रस्त विधाने, कृती,केल्याने तो अडचणीत आला होता.पूर्वी आळंदी पोलिसांनी त्यावर कारवाई केलेली आहे.आळंदीकर ग्रामस्थ या विनाकारण धार्मिक वळण देण्याच्या कृतीमुळे प्रचंड संतापलेले असून त्यांनी सनदशिर मार्गाने तक्रार दाखल केली आहे.