बातमी 24तास
प्रतिनिधी:आरिफ भाई शेख
आळंदीकर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर आळंदीतील सर्व खाजगी वारकरी शिक्षण संस्थांची कडक तपासणी करण्यात आली. लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या असता गुन्हेगाराला शासन व्हावं यासाठी आळंदीकर ग्रामस्थ यांनी संतप्त भूमिका घेतली. प्रशासनाला धारेवर धरले.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी आळंदी मध्ये सुरू झाली यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
खाजगी वारकरी शिक्षण संस्था चालवणाऱ्या व्यक्तींकडून पुरेशी साधन सुविधा या लहान मुलांना दिली जात नाही.आश्चर्याची बाब म्हणजे एका संस्थेमध्ये तर चक्क मुली झोपतात त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
आळंदी नगरपरिषद आळंदी पोलीस स्टेशन प्रशासनाने गठित केलेल्या समितीने सर्वे केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे.महिला व बालकल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या नियमांची बऱ्याच संस्था चालकांना माहितीच नाही त्यातच बऱ्याच संस्था या अनधिकृत पणे सुरू असून केवळ काही संस्थांची यादीमध्ये नावे आहेत.असे आढळून आले आहे मुळात 300 च्या वर खाजगी वारकरी संस्थांचा आकडा असल्याचे समजते. पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही.तसेच मुले आणि मुली यांना एकत्र एकच शौचालय तसेच दुर्गंधीयुक्त परिसर.स्वच्छता नाही अशा बऱ्याच असुविधा जनक गोष्टी समोर आलेल्या आहेत.आळंदी नगरपरिषद,पोलीस प्रशासन यांच्याकडील प्राप्त आकडेवारीनुसार 165 ते 175 इतक्याच संस्था दिसुन येतात. मुळात तसा आकडा पाहिले असता 300 च्या वर संस्थांचा आकडा असून बऱ्याच संस्था या यादीमध्येच नाहीत. आणि त्या राजरोजपमे, नियम न पाळता, या संस्था चालवून आर्थिक लाभ घेत आहेत. आळंदीकर ग्रामस्थांना पूर्वी असणाऱ्या एकमेव वारकरी शिक्षण संस्थेचा अभिमान आहे यांची दिलेली शिक्षण पद्धत याबाबत आदरही आहे.आळंदी मध्ये सुमारे 100 वर्षापासून असणारी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ही मूळ संस्था आहे.अतिशय संस्कारक्षम ,अभ्यासक्रम या ठिकाणी आजही दिला जातो.या वारकरी संस्थेच्या बाबत अभिमानाने सांगावे वाटते की,येथे विद्यार्थी वर्ग यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक वर्ग कुठलेही शुल्क स्वीकारत नाही.मुलांनाही कुठल्याही शुल्क नाही. तसेच जेवणही मोफत आहे. त्याचबरोबर स्वर्गीय जयराम महाराज भोसले सिद्धबेट येथे बऱ्याच वर्षापासून शिक्षण संस्था वारकरी अभ्यासक्रम राबवत होते. या दोन मूळ संस्थेचा कारभार आजही आदर्श आहे. आणि या दोन संस्थेमधून अनेक कीर्तनकार,प्रवचनकार, समाजामध्ये धार्मिक उल्लेखनीय कार्य करत असल्याचे दिसून येते मात्र वरील या दोन संस्थेच्या अनुकरण करत केवळ पैसा कमवायचा या नावाखाली आर्थिक बाजार मांडणाऱ्या बुवा लोकांनी आळंदीचे नाव बदनाम केलेले आहे. सद्गुरु जोग महाराज यांचा आदर्श पाहिला असता वारकरी संप्रदायाला आदराने पाहणारा समाज देशाच्या कानकोपऱ्यात दिसून येईल मात्र काही स्वार्थी लोकांमुळे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था स्वर्गीय जयराम महाराज भोसले यांच्या त्यागाला काळिंब फासला गेला आहे.असे वाटते.आळंदीतील या काळा कारभारासाठी खाजगी वारकरी संस्थेमध्ये 20 ते 25 हजार रुपये एका विद्यार्थ्याकडून घेतले जातात.आळंदीकर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्या सर्व संस्था बंद झाल्या पाहिजे अशी भूमिका घेतली.त्यानंतर मोठ्या प्रमाणात शासनाला जाग आली.आणि धक्कादायक माहिती समोर आली.मुळात या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये एका विद्यार्थ्याचे घेतले जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली जात नाही तसेच विद्यार्थी तेथून पसार झाल्यास त्याच्या पालकांची ती जबाबदारी असते संस्था त्याबाबत कुठली जबाबदारी स्वीकारत नाही.त्याचबरोबर या लहान मुलांकडून अनेक गृह उपयोगी कामे करून घेतले जातात.खाजगी कामासाठी या मुलांचा वापर केला जात असल्याचा आक्षेप आळंदीकर यांनी घेतला होता आणि त्यामध्ये तथ्ये आढळून आले.त्यानंतर मात्र शासकीय यंत्रणेने राबवलेल्या सर्वे मध्ये 175 ते 165 जणांची फक्त नोंद खाजगी वारकरी शिक्षण संस्था म्हणून आहे त्यामध्ये मुळात त्यांची संख्या 300 चे वर असल्याने खूप मोठा अपप्रकार या संस्थेच्या नावाखाली होत असावा याबाबत शंका आहे.प्रशासन यामुळे काय कारवाई करते याकडे आळंदीकर ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत.दरम्यान कडक कारवाईसाठी आळंदीकर ग्रामस्थ संतप्त असून ही कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये प्रशासनात जाब विचारू अशी भूमिका आळंदीकर ग्रामस्थांनी घेतल्याचे चर्चा आहे.