बातमी24तास
(प्रतिनिधी आरीफ भाई शेख )आळंदी (दि.11) आळंदीतील माऊलींच्या मंदिर परिसरामध्ये तृतीयपंथ यांनी उच्छाद मांडला आहे.त्यांच्या त्रासाला कंटाळून आळंदीकर स्थानिक व्यापारी आणि भाविक यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.याबाबत हकीकत अशी की,सुमारे 370 व्यापारी आणि स्थानिक यांच्या सह्यांचा तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. यामध्ये सदर तृतीयपंथी रस्त्यामध्ये उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिकांना अडून बळजबरीने पैसे उकळण्याचे काम करतात तसेच दुकानासमोर उभे राहिल्यास बाजूला उभे रहा असे सांगितले असता इतर तृतीय पंथीयांना बोलवून त्याच्या दुकानासमोर मोठा तमाशा घालतात असे तक्रारी अर्जामध्ये म्हटले गेले आहे. त्याचबरोबर माऊली मंदिर परिसरामध्ये नव वधू वर दिसून आल्यास त्यांना अडवून त्यांच्याकडून १००, ते २०० रुपये मागणी केली जाते कमी दिलेले पैसे नाकारले जातात आणि पैसे दिले नाही तर मात्र त्या 90 वरांना शिव्या आणि शाप दिले जातात अशी तक्रार या अर्जामध्ये करण्यात आली आहे या तक्रारी अर्जावर. ज्ञानेश्वर गोळुंजकर, शशी राजे जाधव,माऊली निंबाळकर,महेश गोरे,योगेश दिघे, राम मोठे,ज्ञानेश्वर आवारे,भाऊ बांगर समीर खैरे,सोमनाथ वाघमारे,या व इतर व्यापाऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या स्वाक्षरी आहेत. आळंदी मध्ये सध्या तृतीयपंथीयांची झुंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यांची संख्या मोठी झाल्यामुळे स्थानिक व्यापारी स्थानिक ग्रामस्थ आळंदीकर भाविक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून त्यांच्या उच्छादाला स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थ वैतागलेले आहेत आणि त्यांचा चांगला बंदोबस्त करावा यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमा नरके यांना अर्ज देत विनंती करण्यात आलेले आहे इंद्रायणी घाट माऊली मंदिर मुख्य परिसर शिवतेज मित्र मंडळ चौक भराव रस्ता या व इतर वर्दळीच्या ठिकाणी हे तृतीयपंथी मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यासाठी दादागिरी करत असल्याची तक्रार आहे एवढेच नाही एखादी दिंडी प्रदक्षिणेला आली तरीही हे तृतीयपंथी रस्त्याचे मधोमध उभे असलेले दिंडीला सुद्धा रस्ता देत नाही असे तक्रारी अर्जामध्ये मांडण्यात आले आहे यामध्ये गांभीर्याची बाब म्हणजे एखाद्या स्थानिक व्यापारी दुकानदाराने थोडे बाजूला उभे रहा अशी विनंती केल्यास इतर साथीदारांना फोन द्वारे बोलून त्याच्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात शिव्या शाप देऊन तमाशा करण्याचे नाचण्याचे काम हे तृतीयपंथी करतात आळंदीच्या भूमीमध्ये अशा गोष्टी अशोभनीय आहे याचा कायदेशीर इलाज करणे कामी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांना तक्रारी अर्ज देण्यात आलेला आहे.