बातमी 24तास Web News Portal
(विशेष प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मंचर येथील तरुणीची लव्ह जिहादची घटना ताजी असताना एकामागे एक घटना उघडकीस येत आहेत. चाकण येथील अशीच एक घटना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. मागील आठवड्यात रात्री दहा ते सव्वा दहाच्या सुमारास चाकणच्या संग्राम दुर्ग किल्ल्यात एका तरुणाला हटकल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. कबीर गुप्ता नाव सांगणारा तरुण सफर आदिल निघाला,त्याला बडवल्याचा घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारीत झाला आहे.तरुणींना घेऊन बसलेल्या असल्याचे समोर येताच त्याच्यासोबत आलेल्या मुलींनीच त्याला चपलेचा प्रसाद दिला.याबाबत चाकण बजरंग दलाचे संयोजक तसेव रामनवमी समितीचे कार्यकर्ते मनोज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये हिंदू साम्राज्य दिन म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान, चाकण तर्फे चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये देखील विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन त्या दिवशी करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यामधून राज्याभिषेक दिन सोहळ्याचा कार्यक्रम आटोपून जात होते. रात्री सव्वादहाच्या सुमारास त्यांना एक जोडपे किल्ल्यात बसलेले दिसले. त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हटकले. विचारणा केल्यावर मुलीने खरे नाव सांगितले. परंतु, त्या मुलाने कबीर असे अर्धवट नाव सांगितले. त्याला आडनाव विचारले असता त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी करताच त्याने टाळाटाळ सुरु केली नंतर त्याने कबीर गुप्ता असे नाव सांगितले व त्याच्या कडे ओळख पत्र मागितले असता ओळखपत्र खोलीवर विसरल्याची खोटी माहिती त्याने दिली.कार्यकर्त्यांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये दर्गा आणि मशीदीचे फोटो आढळून आले. त्याचे पाकिट घेऊन त्यातील ओळखपत्र तपासले असता त्यामध्ये आढळून आलेल्या आधार कार्डावर सफर आदील असे नाव असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. सफर आदील हा झारखंडचा रहिवासी असून तो चाकणमधील एका कंपनीत काम करतो. या मुली देखील तेथेच काम करतात.देशमुख आणि कार्यकर्त्यांनी या तरुणींची समजूत काढली. त्यांना विविध उदाहरणे देऊन लव्ह जिहादचे गांभिर्य पटवून दिले. त्यानंतर या मुलींनी आदिलला चपलांनी मारले. त्याची येथेच्छ धुलाई करीत त्याला चाकण,पुणे सोडण्याची तंबी दिली. दरम्यान, कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याला तात्काळ झारखंडला बोलावून घ्या अन्यथा परिणामांना सामोरे जा अशी तंबी दिली आहे. देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एक तरुणी लव्ह जिहाद सावज होता होता वाचली आहे.