बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आळंदीत मोठी गर्दी झाली आहे. भाविक येत आहेत राहूट्या सजलेल्या आहेत.वेगवेगळ्या धर्मशाळेमध्येही अबाल, वृद्धांचे, वारकऱ्यांची मांदीआळी भरलेली दिसते. आणि अश्या मध्ये आळंदीतील वीज वितरण सेवा मात्र ठप्प झाल्याचे दिसून येते सुमारे चार दिवसापासून वीज पुरवठा अनियमित होत असून कधी कधी तासाभरात तर कधी कधी वारंवार लाईट येत जात आहे. त्यामुळे प्रचंड उकाड्याची असह्य भावना फड घेऊन आलेले वारकरी धर्मशाळेमध्ये सहन करताना दिसत आहेत. या वेळेचा उन्हाळा अतिशय कडक असल्याने वीज अनियमित पुरवठा झाल्यास त्याचा परिणाम विविध फडामध्ये धर्मशाळेमध्ये दिसून येत आहे.विजेच्या वापरावर चालणारे विद्युत पंखे बंद पडल्याने आणि खेळती हवा नसल्याने याची यातना धर्मशाळा आणि विविध फडामध्ये थांबलेल्या वारकरी भाविकांना भोगावे लागत आहेत. मुळात वारीची तयारीची पार्श्वभूमीवर झालेल्या मीटिंगमध्ये सर्व संस्थांचा आढावा घेण्यात आला होता..आळंदीतील महावितरण यांनाही मोठ्या प्रमाणात वारकरी येणार असल्याने आपण अनियमित पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचनाही मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्फत देण्यात आल्या होत्या. परंतु अवघ्या एक दिवसावर प्रस्थान आलेले असताना सुद्धा आळंदीमध्ये विजेचा लपंडाव सातत्याने चालू आहे.सुमारे सहा दिवसापासून अनियमित वीज पुरवठा सातत्याने होत आहे. प्रस्थानच्या काळामध्ये 11 जून रोजी संपूर्ण दिवसभर विद्युत पुरवठा चालू राहील हे आव्हान आळंदी महावितरण संस्थेला आहे.