संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान आज करत आहे.या पार्श्वभूमीवर वैष्णवांचा मेळा आळंदीत भरला होता. आळंदीत वर्षानुवर्षी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. लाखो वारकरी वारीला येतात पण कुठेही गालबोट लागत नाही. मात्र पोलिसांच्या हेकेखोरपणामुळे आज आळंदीत गालबोट लागलेले आहे. वारकऱ्यांवर अक्षरशः गुन्हेगार असल्यासारखे प्रमाणे लाठीचार्ज करण्यात आला. विठू माऊली विठू माऊली म्हणत वारकरी नेहमीप्रमाणे महाद्वारात जमा होतो.आणि प्रस्थान सोहळा जितक्या जवळून पाहता येईल तितक्या जवळून पाहण्याचा प्रयत्न करतात परंतु पोलीस प्रशासनाने यावेळी महाद्वार संपूर्ण मोकळा ठेवला.शेकडे वर्षाची परंपरा आत्ता पर्यंत कधीही गर्दी असताना गालबोट लागले नाही. तसेच वारकऱ्यांकडून कायदा हातात घेतला गेला नाही. या सर्वांची जाणीव प्रशासनाला वारंवार करून देऊन. सुद्धा प्रशासन आणि देवस्थान यांनी मात्र याकडे कानाडोळा केला. यामध्ये देवस्थानही तितकेच गुन्हेगार आहेत. जितके पोलीस कारण देवस्थानलाही याबाबत संपूर्ण माहिती असते की प्रस्थान सोहळा हा भावनेचा विषय असतो.यामध्ये कशा प्रमाणे भाविक येतात .याची जाण पोलिसांना देवस्थानने करून द्यावी.ही आग्रही भूमिका होती. परंतु सोहळा आदर्श करण्याच्या नावाखाली आज झालेला लाठी चार्ज ही खूप निंदनीय बाब आहे. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत मानावी लागेल. पोलिसांनी केलेला लाठीच्या जखमा या मनावर झालेल्या आहेत आणि या कधी भरुन निघतील याबाबत मात्र वारकरी बांधवांच्या मनात साशंकता आहे.
दरम्यान
आळंदीत आज लाठीमार झालेला नाही,तर किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला आहे.पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या ५६ पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत ३ वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले.मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले होते. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी ७५ जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे.असे आवाहन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.
बातमी 24तास या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.