
बातमी 24तास, चाकण (प्रतिनिधी) – पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजातील अंतिम व्यक्तीच्या उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय निवासी शिबिर चाकण येथील सह्याद्री अकाडमी मधे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या विचारांविषयी चर्चा करण्यात आली.शिबारचे उद्घाटक धर्मेंद्र खांडरे यांच्या हस्ते करण्यात आले.”इतिहास एव विकास”यावर खांडरे यांनी प्रबोधन केले.”वैचारिक अधिष्ठान” वर गुलाब म्हालस्कर यांनी विचार व्यक्त केले “कार्यविस्तार”बाबत अविनाश बावरे यांनी मार्गदर्शन केले “कार्यपद्धती”बाबत भगवान शेळके यांनी माहिती दिली “अपनी सरकार की उपलब्धीया”साठी सायली बोत्रे “सोशल मीडिया”वर प्रिया पवार यांचे मार्गदर्शन लाभले “बुथप्रबंधन”साठी डॉ.ताराचंद कराळे यांचे प्रबोधन होऊन शिबराची सांगता झाली.पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानववाद आणि अंत्योदय यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. त्यांच्या विचारांमुळे समाजातील अंतिम व्यक्तीच्या उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते.या शिबिरात भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजसेवेचे कार्य करण्याचा संकल्प केला.या शिबिराचे आयोजन चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी केले .या प्रसंगी प्रिया पवार ,शांताराम भोसले,संदीप सोमवंशी,शाम पुसदकर,संदेश जाधव अजय जगनाडे अनिल सोनवणे धीरज वाळुंज मंगेश देसाई संतोष ओतारी प्रितम शिंदे मालिनी शिंदे प्रवीण करणे अरुणा पगारे सरला बोरसे किरण वरखडे बाळासाहेब भोपे भाऊसाहेब कुटे संतोष दत्ता परदेशी गणपती गौडा पाटील नसीम पठाण प्रशांत शेवकरी शार्दूल पठाण किशोर भुजबळ योगेश देशमुख श्रीकांत परदेशी रावसाहेब ढेरंगे सुधीर भांगरे सूर्यकांत बारणे अभय काळे किशोर कुमठेकर अरुण हलगे संतोष गायकवाड भारतीय जनता पार्टी चे असंख्य कार्यकर्त्यानी भाग घेतला.