खेड तालुक्यातील आदिवासी भागासाठी ५ कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर:-आमदार बाबाजी काळे यांची माहिती.

Share This News

बातमी 24तास,(राजगुरूनगर)| खेड तालुक्यातील आदिवासी भागासाठी आमदार बाबाजी काळे यांनी विशेष प्राधान्य देत पाणी, रस्ते, वीज या मुख्य गरजांसाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा करत खेड तालुक्याच्या आदिवासी वाडीवस्तीवर विकास पोहचविण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

आदिवासी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना (२०२५-२६) अंतर्गत जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण कामांना निधी उपलब्ध झाला आहे.प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या माध्यमातून लघु पाटबंधारे विभागाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, आमदार बाबाजी काळे यांच्या विशेष सूचनेनुसार या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.सदर योजनेअंतर्गत भोमाळे चिराचा ओढा येथे नवीन साठवण बंधारा ३७ लाख रुपये तर खरपुड म्हसेवाडी येथे साठवण बंधारा ४२ लाख रुपये. त्याचबरोबर कारकुडी येथे कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी ७६ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा’ योजनेअंतर्गत रस्ते सुधारणेसाठी देखील भोरगिरी- १० लाख, आडगाव- ५ लाख, देशमुखवाडी- १० लाख, बिबी- गुंडाळवाडी १२ लाख ५० हजार रुपये, शेलू – १० लाख रुपये, पांगरी- बुट्टेवाडी – ९ लाख ९५ हजार रुपये, दोंदे – ५ लाख रुपये तर रेटवडी येथे सभामंडप बांधण्यासाठी तब्बल २० लाख रुपये असा एकूण ८२ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान ‘आदिवासी किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत’ ग्रामीण रस्ते सुधारणेसाठी नायफड – सरेवाडी ४५ लाख रुपये तर नायफड – नाव्हाचीवाडी ४५ लाख रुपये आणि कुडे बु ते बांगरवाडी या रस्त्यासाठी ४० लाख रुपयांचा असा एकूण तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर आदिवासी भागातील वाहतूक व दळणवळण व्यवस्था सुधारणेसाठी आव्हाट येथील शेरेवाडी येथे ७१ लाख ५८ हजार रुपयांचा साकव बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. आदिवासी भागातील दळणवळण, वाहतूक, वस्ती सुधारणा यानंतर वीज व्यवस्था सुधारण्यासाठी देखील ७८ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कारकुडी- १४ लाख ७७ हजार रुपये, शेंदूर्ली- ६ लाख ३ हजार रुपये, धुओली- ६ लाख ३ हजार रुपये, मांदोशी – ६ लाख ३ हजार रुपये, भिवेगाव- ११ लाख ६३ हजार रुपये, धामणगाव – २ लाख ४ हजार रुपये, डेहणे – १२ लाख ७३ हजार रुपये, नायफड – ७ लाख ६० हजार रुपये, भोमाळे – ६ लाख ३ हजार रुपये आणि पाभेसाठी – ६ लाख ३ हजार रुपये असा एकूण ७८ लाख ९२ हजार रुपये एवढा निधी आमदार बाबाजी काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाल्याने अदिवासी भागातील ग्रामस्थांनी आमदार काळे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy