राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(प्रतिनिधी)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात गेल्या आहेत.शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल घेत कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy