बातमी 24तास, Web News Portal
(क्राईम रिपोर्टर) पुण्यात होत असणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहता पुणे मुलींसाठी सुरक्षित आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. धाडसी तरुण मुलीने उल्लेखनीय धाडस दाखवले आणि स्वत: ला अत्याचारा तून वाचविण्यात यश मिळविले. मागील तीन चार दिवसांपासून राज्यातून हादरवणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यातून देखील अत्याचाराच्या घटना रोज समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात सध्या मुली सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच रोज अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच आपल्या हिंमतीने आणि धैर्याने धाडसाने सामूहिक बलात्कार होण्यापासून स्वत:चा बचाव केला आहे.याबाबत ची माहिती अशी की,चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडला.ही घटना सोमवारी 5 जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घोरपडी परिसरात घडली. मुंढवा पोलिसांनी समीर शेख (रा. घोरपडी), कार्तिक आणि मुचा यांच्याविरुद्ध विनयभंग, मारहाणीचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हे प्रकरण कोरेगाव पार्क पोलिसांकडे सोपवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी मोबाईलमध्ये मग्न असताना वरील तिघे आरोपी तिच्याजवळ आले व त्यांनी बळजबरीने तिचा फोन हिसकावून घेतला आणि शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली, तिने नकार दिल्यास आणखी इजा होईल, अशी धमकीही दिली हे घृणास्पद कृत्य करण्याच्या प्रयत्नात आरोपींनी तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने धैर्याने प्रतिकार केला आणि त्यांच्या तावडीतून निसटण्यात यश मिळविले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या माहितीला तत्पर प्रतिसाद देत घोरपडी परिसरात आरोपींना पकडले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास चालू आहे.