बातमी 24तास Web News Portal
(क्राईम रिपोर्टर )
पुणे जिल्ह्यात शिरूर शहरात व्यावसायिकाच्या फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आलेला असून सिमेंट आणि स्टील विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्याची माल देण्यासाठी म्हणून पैसे घेऊन एक लाख 17 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार , कैलास ताराचंद चोरडिया यांनी फिर्याद दिली असून त्यांचा शहरात सिमेंट आणि स्टील विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची अभिजीत भाऊसाहेब दिघे ( राहणार संगमनेर जिल्हा नगर ) याच्यासोबत ओळख झालेली होती त्यावेळी अभिजीत याने मी तुम्हाला स्टील पुरवण्याचे काम करतो तुम्हांला स्टील मटेरियल देखील देतो असे सांगत चोरडिया यांच्याकडून एक लाख 17 हजार रुपये घेतलेले होते. मात्र एक महिना उलटून देखील त्याने काहीही मटेरियल दिले नाही म्हणून चोरडिया यांनी त्याला संपर्क केला. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.काही कालावधी उलटल्यानंतर त्याचा संपर्क देखील होऊ शकत नव्हता त्यानंतर कैलास ताराचंद चोरडिया ( वय 50 वर्ष राहणार शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे ) यांनी अभिजीत दिघे याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.