प्रेम प्रकरणातून प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून या घटनेने पुणे शहर हादरले

Share This News

बातमी 24तास WebNewsPortal

(क्राईम रिपोर्टर ) पुणे : प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा धक्कादायक प्रकार वाघोलीत उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून हा खून झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यशवंत महेश मुंडे ( वय २०) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव असून अनुजा महेश पणाळे असे खून केलेल्या प्रेयसीचे नाव आहे.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, प्रियकर आणि प्रेयसी दोघेही काही दिवसांपासून वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत रहात होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दोघेही एकत्र राहत होते. पहाटेच्या सुमारास प्रियकराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.या घटनेत प्रथमदर्शनी प्रेयसीने घरात भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकरावर वार केले. प्रियकराच्या सर्वांगावर वार केल्याचे दिसून येत आहे. प्रियकराला रुग्णालयात हलवले मात्र उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्या दोघांच्या भांडणात प्रेयसीही जखमी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. हा सगळा प्रकार नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy