बातमी 24तास WebNewsPortal
( कल्पेश भोई ) अल्पवधित प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावा वरुन सध्या राज्यात वाद सुरु असताना आता खेडचे राष्ट्रवादी चे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीला पाठिंबा दिला आहे. गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आली,तिला संपवू नका, अस आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे.आमदार दिलीप मोहिते पाटील त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे गौतमी पाटील हिला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला होता. पण नंतर त्यांनी आपल्या भूमिकेबाबत यू टर्न घेतला. तर दुसरीकडे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीचं कौतुक करत तिचं समर्थन केलं आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात होते, ऐवढा चाहता वर्ग गौतमीचा झाला आहे. राज्यात आजकाल अनेकजण पाटील आडनाव लावत असल्याचे दाखले देत मोहिते पाटलांनी राज्यकर्त्यांना साद घालत गौतमीला संपवू नका, असे आवाहन केलं आहे .”गौतमी पाटील हिने पाटील नाव लावलं तर तुमचं काय बिघडलं? तुम्ही तिला का ट्रोल करताय हे मला कळत नाही. ती नवीन कलाकार आहे. तिचं आयुष्य इतक्या लवकर संपवू नका, एवढीच माझी विनंती राहणार आहे. एखाद्या कलाकाराचं जीवन संपवू नका. ती अतिशय गरीब परस्थितीतून तिच्या कलेच्या माध्यामातून लोकांना कळली”,तिच्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.“पिंपरी चिंचवडचे पोलीस अधिकारी आज तिच्या कार्यक्रमावरहही बंदी घालत आहेत.पण एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी तिच्या कार्यक्रमांना जमते”, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले.दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला गौतमीला पाठिंबा दर्शवलेला. पण नंतर त्यांनी ट्विटरवर गौतमीच्या विरोधात भूमिका मांडली. “छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, मी या मताचा आहे”, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. पण त्यानंतर काही तासांनी संभाजीराजे यांनी आपली भूमिका मागे घेतली. त्यांनी ट्विटरवर आपली सविस्तर भूमिका मांडली.“काल एका पत्रकाराने एका महिलेचा कलाकार असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मलाप्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे”, असं संभाजीराजे आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले.“मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची “कला” मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण”, अशी भूमिका संभाजीराजे यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये मांडली आहे.गौतमी पाटील हिच्या संदर्भात विविधवाद निर्माण केले जात आहे. कधी तिच्या मानधनावरुन वाद केला जातो, तर कोणी तिच्या आडनावावरुन वाद सुरु केला आहे. तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी केली जाते. गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आली आहे . तिला संपवू नका, असे आवाहन करताना खासदार अमोल कोल्हे यांनी समाजातील ठेकेदारांना चार खडे बोलही सुनावले.हिची क्रेझ निर्माण झाली आहे. परंतु कला क्षेत्रामध्ये मिळत असलेले यश कधीच कायमस्वरुपी नसते. आज तिच्यासंदर्भात जे होत आहे, ते प्रत्येक कलाकाराच्या बाबती होत असतं. आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. कलाकार म्हणून ती तिची कला सादर करत आहे. तो तिचा व्यवसाय आहे. यामुळे तिला अकारण ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबणा होऊ नये, अशी काळजी घ्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले.