सोसाट्याचा वारा.. मेघ गर्जना विजेचा कडकडाट आणि तुरळक गारांचा वर्षाव करत आळंदीत पाऊस

Share This News

बातमी 24तास Web News Portal

(प्रतिनिधी आरिफ शेख) सुसाट वारा सुटत मेगगर्जनेच्या गडगडाटासह आळंदीत जोरदार पावसाने आज हजेरी लावली. सुमारे साडेतीन तास एक सलग पाऊस सुरू होता.कधी वेग कमी तर कधी जास्त असा होत या पावसाने आळंदीतील रस्ते न्हाऊन निघाले.अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला.आणि नागरिकांनी असह्य होणाऱ्या उष्णतेच्या लाटा पासून सुटकारा मिळवला.पाऊस सुरू असताना तुरळक प्रमाणात छोट्या गारांचा पाऊस झाला. परंतु तो जास्त तग धरू शकला नाही. तसेच पावसाच्या वेगाबरोबर वाऱ्याचा वेग जाणवत होता. पाऊस सुरू होण्याआधी सुमारे तासभर सुसाट वारे सुटले. परंतु पाऊस आला नाही.नंतरच्या काळामध्ये पावसाला अचानक सुरुवात झाली.आणि नागरिकांची तारांबळ उडाली परंतु वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालेला आहे. या जोरदार पावसाने रस्त्यावर नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. रस्त्यांवर असलेली धूळ पाण्याबरोबर वाहून गेली. आणि सर्वत्र पावसाच्या पाण्याने व्यापलेल्या परिस्थितीमध्ये काही अबाल वृद्ध यांनी याचा आनंदही घेतला. सुमारे साडेतीन चार तासांच्या मोठ्या कार्यकालानंतर पावसाने विश्रांती घेतली. येणाऱ्या काळात मान्सून लवकर असल्याने ही पावसाची सुरुवात आहे की अवकाळी पाऊस हे पुढील काही दिवसात लक्षात येईल.माऊलींचे प्रस्थान तोंडावर आहे. आणि सर्वत्र मान्सून वेळेवर दाखल झाला तर मात्र माऊलींच्या पालखी प्रस्थानसाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतील. शेतीची कामे उरकून पंढरीच्या वारीला जातील अशी आशा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy