बातमी 24तास
(आळंदी,प्रतिनिधी आरिफभाई शेख.
आषाढी वारी पालखी सोहळा अंतर्गत आळंदी नगर परिषदेमार्फत एक तृतीय उपक्रम राबवला गेला. या उपक्रमाबाबत मुख्य अधिकारी कैलास केंद्रे यांनी माहिती दिली की यामुळे एम आय टी कॉलेज येथील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वयंसेवक बनत आळंदी स्वच्छ ठेवण्यासाठी आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांमुळे निर्मल वारी उपक्रम राबवला. रस्त्याच्या बाजूला तसेच आळंदीच्या विविध भागांमध्ये पाणी पिऊन घेतलेल्या खाली बॉटल तसेच अन्नदान करून झाल्यानंतर पडलेले अन्न अन्नदानाच्या डिश या रस्त्यावर पडलेला दिसून येत असे दिवस रात्र 24 तास या बाबत सतर्करात स्वच्छता राखण्याचा काम या विद्यार्थ्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी आळंदी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये मुख्याधिकारी यांनी आळंदी नगर परिषदेचे प्रमाणपत्रे त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाबाबत बोलताना एमआयटी कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सेवाभाव निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली तसेच स्वच्छता करत असताना आजूबाजूच्या परिसर त्याची घाण आहे. त्याची भावनाही मनाला शिवली नाही असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तसेच माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी येणारा भाविक यांची सेवा करण्याचा आनंद मिळत होता त्यामुळे अहोरात्र कष्ट करू नये थकवा चेहऱ्यावर जाणवला नाही अशी भावना या विद्यार्थ्यांची होती. सत्य उपक्रमाबद्दल आळंदी नगर परिषदेच्या या कार्यक्रमामुळे निर्मल वारी उपक्रमात वारकऱ्यांची सेवा करण्याचा अनोखा प्रसंग अनुभवल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे हे प्रशस्तीपत्र वाटप करत असताना मुख्याधिकारी कैलास केंद्रे बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड कर्मचारी घोडे तसेच आळंदी नगरपरिषद इतर अधिकारी उपस्थित होते.