राज्याच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने’सह महिला- भगिनींसाठी अनेक योजनांचा समावेश करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना विमानतळ येथे ओवाळून त्यांचे आभार मानले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, वैशाली नागवडे, मोनिका हरगुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी उपस्थित महिलांनी महिलांसाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांबाबत समाधानही व्यक्त केले. त्यांनी फुलांची उधळण करीत आनंद व्यक्त केला.