बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
(क्राईम रिपोर्टर ) कोयत्याने वार केल्याचा गंभीर आरोप असतानाही दोषारोपपत्र दाखल होण्याआधी केलेला जामीन अर्ज आणि मोक्का लागू होत नसल्याच्या आधारावर दोघांसह पाच आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटी शर्तीवर जामीन मंजूर केला.
याबाबत अधिक माहिती अशी की,हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक १९१५/२०२३, मध्ये आरोपी लखन बाळू मोहिते वर फिर्यादी याला कोयत्याने वार केल्याचा आरोपावर त्याच्या अन्य साथीदारांसोबत अटक करून मोका कायद्याअंतर्गत गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली होती. लखन बाळू मोहिते आणि तुषार बाळू मोहिते यांनी कोयत्याचा बेस असून सुद्धा दोषारोप पत्र दाखल होण्याआधी जामीन अर्ज दाखल केला होता, अन्य आरोपी ओमकार मारुती देढे, हशनेल शेनागो आणि अनिकेत रवींद्र पाटोळे यांनी देखील जामीन अर्ज दाखल केला होता. मूळ फिर्यादी यांनी आरोपी जामिनावर सुटल्यास जीवे मारतील अशी शक्यता वर्तवली व सदर गुन्ह्यातील अन्य फरार आरोपी यांनी धमकवले असल्याबाबत कोर्टासमोर लेखी स्वरूपात बाब दाखल केले. सरकार पक्षाने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, टोळी प्रमुख सुरज उर्फ चुस बाळू मोहिते हा अध्याप फरार आहे आणि कोयत्यासारखे घातक हत्यार आरोपी लेखन याने वापरल्याने त्याचा जामीन नामंजूर करण्यात यावा असा आक्षेप घेतला. आरोपी लखन व तुषार यांच्या वतीने वकील सुशांत तायडे यांनी सदर गुन्हा हा खोटा स्वरूपाचा असून मोका देखील लागू होत नसल्याचा युक्तिवाद केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश विशेष मोका कोर्ट मे. व्ही आर कचरे साहेब यांनी सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायिक दृष्ट्या योग्य असा न्यायनिर्वाडा देत सर्व आरोपी यांना रू ५०,०००/- रकमेच्या जात मुजलक्यावर सोडण्याचे आदेश पारित केले. आरोपी लखन बाळू मोहिते व तुषार बाळू मोहिते यांच्या वतीने युक्तिवाद ऍडव्होकेट सुशांत तायडे यांनी केला आणि सदर खटल्याचे संपूर्ण कामकाज प्रज्ञा कांबळे दिनेश जाधव जितू जोशी आणि शुभांगी देवकडे यांनी केले.